मी मराठीच्या पतनाला रविंद्र आंबेकरच जबाबदार

जून २०१३ मध्ये फक्त अर्धा तास बुलेटीन चालवणाऱ्या मी मराठी वृत्तवाहिनीत आंबेकरांची एका राजकीय पुढाऱ्याच्या वशिल्याने कशीबशी वर्णी लागली. जय महाराष्ट्र मधून बेरोजगार झाल्यानंतर आंबेकरांसाठी हा मोठा आधार होता,त्यानंतर महेश मोतेवारानी मी मराठी चॅनल २४ तास करण्याचा निर्णय घेतला पण आंबेकरांच्या कार्यक्षमतेवर विश्वास नसल्याने त्यांनी सुरुवातीला कुमार केतकर आणि नंतर भारतकुमार राऊत यांना चॅनलमध्ये सामावून घेतले. त्यानंतर निखिल वागळे बेरोजगार झाल्यानंतर आंबेकरानीच या वरिष्टांना आवर घालण्यासाठी वागळेची मी मराठीत सोय लावली. आता वागळे केतकर यांचा ३६ चा आकडा सर्वश्रुत आहे.त्यानंतर आंबेकरांनी कसेबसे मी मराठीत पाय रोवले आणि मग मालकाची काही खासगीतील कामे करून त्यांचा कसाबसा विश्वास संपादन केला.
हा झाला मी मराठीचा उत्कर्ष काळ, ज्याचं क्रेडीट आंबेकर घेतात, मग उतरत्या काळात सर्वसामान्य पत्रकारांची झालेली ससेहोलपट, तीन - तीन महिने लांबलेले पगार, ऑफिस मधून मशिनरी उचलणे, चॅनलचा दर्जा खालावणे आणि सरते शेवटी चॅनल बंद पडणे याच क्रेडीट आंबेकर यांना कसे काय बरे टाळता येईल. संपादकाचे काम हे काही फक्त मालकाकडून पैसा घेणे आणि चॅनल चालवणे हे तर नक्कीच नसते. तर ते चॅनल आर्थिक दृष्ट्या पायावर उभ करणे हे असते. ज्यात आंबेकर पूर्णपणे अपयशी ठरलेत. परिणामी अनेक पत्रकारांच्या नशिबी ससेहोलपट आली.
यामागचं उकल अशी… 
सर्वच चॅनलवर डॉक्टरांचा विविध आजारावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम चालतो,हा कार्यक्रम एक तर पेड असतो किंवा सरळसोट त्याची जाहिरात घेतली जाते, मी मराठीत मात्र मयांक भागवत याने घेतलेल्या मुलाखती अगदी फुकट होत्या. इथपर्यंत ठीक पण एखादा प्रथितयश डॉक्टर जाहिरात देऊन जर मुलाखत द्यायला तयार असेल तर सरळ सरळ त्याची मुलाखत नाकारली जात होती, याचा अर्थ व्हाईट मनी नको होता, असा घ्यायचा का ?
सर्व tv चॅनलवर रिलीज झालेल्या अथवा रिलीज होणाऱ्या चित्रपटांची शो चालतात, ज्या शोला सुद्धा चित्रपट निर्माते लाखो रुपये देत असतात. ज्याचं स्वरूप जाहिरात असच असत, पण मी मराठीत मात्र कित्येक दिवस हे पैसे सरळ मार्गाने स्वीकारलेच जात नव्हते. अगदी शेवटी याची चर्चा झाल्यानंतर मात्र हे पैसे स्वीकारले जाऊ लागले. मग तोपर्यंतच्या पैश्यांचा हिशोब काय ?
आता मशिनरी आणि कॅमेरे रेंटवर घेण्याच्या प्रकारातले गौडबंगाल …
मुळात या मशिनरी आणि कॅमेरे ज्या दरात भाड्याने घेतले होते. त्याच दराने फक्त त्या वस्तूंची instolment भरली असती तर कदाचित मी मराठीने त्या सगळ्या वस्तू किमान चार -चार वेळा तरी विकत घेतल्या असत्या. पण कमिशन सिस्टीमने मी मराठीचा आज बळी घेतला.
याच आंबेकारांनी मी मराठीचे महेश मोतेवार लंडनमधले बाबासाहेबांचे स्मारक विकत घेणार आहेत अशी पुडी सोडली होती,
स्मारक विकत घ्यायला निघणारे आज पगारासाठी इतके बेहाल होतील असे वाटले नव्हते.
आंबेकरानी जर मी मराठी चॅनल इमाने इतबारे चालवले असते तर आज ही वेळ आली नसती. आंबेकरांनी लाखो रुपये कमावले आहेत पण बिचाऱ्या कर्मचार्याचे काय ? याची आंबेकर यांना कधी काळजी वाटली आहे का ?