तरुण भारतचा नाशिकमध्ये आतबट्ट्याचा खेळ !

जळगाव येथून प्रसिध्द होणाऱ्या तरुण भारतने नाशिकमधून स्वतंत्र आवृत्ती काढण्याचा घाट घातला आहे. मात्र, जळगाव आवृत्तीच्या खर्चाचा ताळमेळ अजूनही जमत नसल्यामुळे नाशिकमध्ये आवृत्ती काढून निवडणूक काळात पीएन स्वरुपात मिळविलेली, आहे ती गंगाजळी खर्च न करण्याचा निर्णय व्यवस्थापनाशी संबंधित परिवाराच्या कोअर टीमने घेतला आहे.
तरूण भारतच्या जळगाव आवृत्तीचा मोफत, वार्षिक वर्गणीदार मिळून जेमतेम खप आहे. गेल्या अॉगस्ट 2015 पासून विश्वस्त मंडळात नवे अध्यक्ष असून तेच संपादक संचालक आहेत. त्यांनी स्वतःच्या संपादकत्वाखाली तरुण भारत नाशिक आवृत्ती सुरु करावे असे प्रकरण मांडले आहे. नाशिकच्या डीबी प्रेसमध्ये अंकाची छपाई करायचे नियोजन आहे. यासाठी संपादक संचालकांनी नाशिकचा दौरापण केला आहे. यापूर्वी नाशिकमध्ये मुंबई तरुण भारत येत आहे. तोच अंक नीट सेटल झालेला नसताना नाशिक तरुण भारत तेथे जातो आहे.
जळगाव तरुण भारतची अवस्था सध्या अडचणीची आहे. त्यात पुन्हा नाशिकचा खर्च म्हणजे खर्चाची नवी अडचण. याची जाणिव संबंधित परिवाराला आहे. तरुण भारतचे गृप म्हणून व्यवस्थापन नागपूर तरुण भारतच्या नेतृत्वात असोशिएट करते. जळगाव तरुण भारत आजही 8 पानांचा असून इतर दैनिके त्यापेक्षा जास्त पानांची आहेत. जळगाव जिल्ह्यात तरुण भारतला भाजप, संघ आणि इतर परिवाराने वार्षिक वर्गणी रुपात स्वीकारलेले नसताना नाशिक आवृत्तीचा आतबट्ट्याचा खेळ सध्या सुरु आहे.
नाशिकला तरुण भारतचा अंक काढत असताना तेथे तरुण भारतला माणसे मिळणे अवघड आहे. जळगाव तरुण भारतमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक सध्या चर्चेत असून जळगावात जाहिरातीचा माणूस ग्रामीणचा संपादक म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात येते.