पुढारीसाठी दुस-या दिवशीही मुलाखती

औरंगाबाद - पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीसाठी  दुस-या दिवशीही मुलाखती पार पडल्या.या मुलाखतीसाठी लोकमत,दिव्य मराठी,महाराष्ट्र टाइम्स,पुण्यनगरी,सकाळसह सर्व मोठ्या वृत्तपत्रातील कर्मचारी उपस्थित होते.दिवसभरात किमान ५० ते ६० जणांनी मुलाखती दिल्याची माहिती बेरक्याच्या हाती आहे.
पुढारीची औरंगाबाद आवृत्ती येत्या १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.संपादकीय विभागासाठी शनिवारपासून मुलाखती सुरू झाल्या आहेत.रविवारीही या मुलाखती पार पडल्या.या मुलाखतीसाठी कालपासून आजपर्यंत लोकमतचे दहा,दिव्य मराठीचे १६, सकाळचे चार,महाराष्ट्र टाइम्सचे दोन,पुण्यनगरीचे दोन आणि इतर सर्व स्थानिक दैनिकाचे कर्मचारी होते.जे सध्या कुठेच काम करत नाहीत,त्यांचा भरणा अधिक होता.त्याचबरोबर लोकमत,दिव्य मराठी,सकाळमधून आलेले सर्वजण ट्रेनि आणि कमी पगारचे होते.मान्यवरापैकी कोणीच नव्हते,अशी माहिती आहे.पुढारीचे प्रशासन प्रतिस्पर्धी दैनिकापेक्षा अधिक पगार द्यायला तयार नाही,त्यामुळे कोणीच जायला इच्छुक नसल्याची माहिती आहे.