● हा 'ग्राऊंड रिपोर्ट' असल्याचे म्हटलेय. त्यात *नजनपाटील
रविवारी पुन्हा चोपडा पोलीस ठाण्यात रुजू झाले* असे म्हटले आहे. आणि तसे जर
ते झाले नसतील तर हा वार्ताहर ग्राऊंडवर जाऊन फक्त चकाट्या पिटून आला,
असेच म्हणावे लागेल. कारण नजनपाटील रुजू झाले, या एकाच गृहीतकावर ही 'न
झालेल्या बदलीची' बातमी रंगविलेली आहे. ते रविवारी सायंकाळपर्यंत रुजू
झालेले नव्हते, असं याच बातमीतील कोटमध्ये SP म्हणताहेत. हा कोट साहजिकच
"ग्राऊंड"वरून परत आल्यानंतर जळगावात डेस्कवरून/ऑफिसमधून घेतला असेल. त्यात
SP रुजू नाही म्हणताहेत तर हे वार्ताहर त्या आधी "ग्राऊंड"वर नजनपाटलांना
कोणाकडे रुजू करून आले?? यातूनच ही फुसकी व फसवणूक करणारी खोटारडी व
तथ्यहीन बातमी आहे, हे स्पष्ट होतेय!
● "नजनपाटील असोत वा नसोत, त्यामुळे चोपडा शहरातील जीवनमान
काहीच बदलले नाही," हे बातमीतील अत्यंत विनोदी वाक्य आहे. हे तर जनरलाईज्ड
स्टेटमेंट आहे. असं कुणीच कुठे गेलं तरी कोणत्याच शहरातील नागरिकांच्या
जीवनमानावर फरक पडत नाही. खडसेंसाठी एव्हढी जन आंदोलने झाली, जिल्हा
पेटला... मात्र, ते पदावरून गेल्याने कुणाच्या जीवनमानात काही फरक पडला का?
नजनपाटील तर त्या तुलनेत अत्यंत किरकोळ!! उद्या SP, फडणवीस गेले पदावरून
तरी कुणाच्या जीवनमानात फरक पडणार नाही!!
● आता या बातमीत हेडिंगमध्ये "5-10 जणांचा स्वार्थ" असे
म्हटलेय; पण हा स्वार्थ काय, ते 5-10 जण नेमके कोण हे बातमीत कुठेही
सांगितलेले नाही!! "इगोमुळे 4 दिवस चर्चा" असे म्हटलेय; मात्र ईगो कुणाचा
आणि काय? हे कुठेही बातमीत सांगितलेले नाही. *ही 100% टेबलवर पकवलेली
स्टोरी आहे!!* यात नेमकं, नावासह, स्पष्ट काहीही नाही.... नागरिकांनी मते
व्यक्त केल्याचे बातमीत म्हटलेय, पण त्यांची नावे, हुद्दा व फोटो नाहीत!!
मग कोण ते नागरिक?? "भास्कर"च्या "ग्राऊंड रिपोर्ट" गाईडलाईन्सला छेद
देणारी ही बातमी आहे.
● *ही बातमी म्हणजे मुख्य संपादकाला शेंडी लावून त्याची
दिशाभूल करण्याचा प्रकार आहे*!! काल त्यांनी जळगावात सर्वानाच झापून काढले.
नेमकी ही माहिती औरंगाबादहून लीक झाली!! खरेतर चूक सुधारण्याची संधी होती
जळगाववाल्यांना!! पण त्यांनी "गिरे भी तो टांग उपर" असा प्रकार करून
तथ्यहीन बातमी दिली. Far Away From Facts अशा या टेबल बातमीत "नजन पाटील
रुजू झाले आणि त्यांची बदली झालीच नाही" ही दोन मुख्य गृहितकेच चुकली
आहेत... वाईट वाटतं ते एकाच गोष्टीचं की गणेश सुरसे सारखा चांगला रिपोर्टर
कुणाचा तरी अट्टाहास आणि ईगो जपण्याच्या नादात वापरला गेला, त्याचं नाव
खराब झालं!!!
याच विषयावर लोकमत मधील बातमी...
🏻🏻
http://epaper.lokmat.com/ newsview.aspx?eddate=07/18/ 2016&pageno=3&edition=13& prntid=22833&bxid=27134952& pgno=3
🏻🏻
http://epaper.lokmat.com/
आता ज्या 4-5 लोकांचा स्वार्थ आहे आंदोलनामागे ने नेमके कोण आहेत??
सक्तीने बंद करायला लावणारेच कदाचित स्वार्थी असतील....
'दिव्य मराठी'च्या बातमीत उल्लेख असलेले स्वार्थी!!
सक्तीने बंद करायला लावणारेच कदाचित स्वार्थी असतील....
'दिव्य मराठी'च्या बातमीत उल्लेख असलेले स्वार्थी!!
आता या नजनपाटील च्या बदली न होऊ देण्यात या लोकांचा काय स्वार्थ आहे ते तरी कुणी खुलासा कृपया करावा!!
म्हणजे "दिव्य मराठी"च्या बातमीत ज्यांचा "फक्त 4-5 स्वार्थी
लोक" असा उल्लेख आलाय तेच का हे लोक?? "लोकमत"च्या बातमीतील नावे या
लोकांची आहेत का??
'दिव्य मराठी'च्या बातमीत नजनपाटील रविवार सायंकाळपर्यंत रुजू
झाले नव्हते, असा उल्लेख आहे; म्हणजे SP सुपेकर यांनीच ते सांगितलं आहे.
याच बातमीत नजनपाटील म्हणतात, रविवारी रात्री मी रुजू झालो आहे.
खरे काय आहे? - *नजनपाटील रुजू झाले आहेत की नाही??*
आता 'लोकमत'ची बातमी पाहा. नजनपाटील रविवारी सायंकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनला आले पण त्यांनी पदभार स्वीकारला नाही!!
याचा अर्थ दिव्य मराठी किंवा लोकमत यातील एक बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी आहे...
किंवा
*नजनपाटील हा अत्यंत खोटारडा अधिकारी आहे. त्याने आपण रविवारी रुजू झालो, हे 'दिव्य मराठी'ला खोटेच सांगितले!!*
किंवा
मग SP तरी खोटारडे आहेत. कारण नजनपाटील म्हणतात, मी रविवारी
रात्री रुजू झालो; पण SP म्हणतात, रविवारी रात्री उशिरापर्यंत रुजू झालो
नव्हतो...
*आता नेमकी फॅक्ट काय...?*