मुंबई - मी मराठीने इंटनेटचे पैसे न भरल्यामुळे काल संपूर्ण एक दिवस जुने बुलेटीन चालविण्यात आले आणि दोन दिवसापुर्वी दिल्लीवरुन सर्व्हर डाउन झाल्यामुळे मी मराठी कर्मचाऱ्यांचा पोपट झाला.
अशात दिल्लीवरुन मी मराठीचे जुने शो लावुन स्लॉट भरुन काढण्याचे काम केले, त्यात तुळशीदास भोईटे यांचा जुना शो क्रॉस फायर हा शो दिल्लीवाल्यानी लावला आणि मी मराठी कर्मचाऱ्यांची पळापळ झाली.
त्यामुळे एकंदरीत अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले ज्युनियर मी मराठीचा लंगडा कारभार सांभाळत असतील तोपर्यंत मी मराठीचा हाशा होतच राहील..
आधीच डबघाईला आलेली मी मराठी वाहिनी आता सर्वांसाठी विनोदाची वाहिनी बनली आहे.