महाराष्ट्र 1 च्या संपादकपदी आशिष जाधव ?

मुंबई - सनातनचे अभय वर्तक यांच्याबरोबर वादावादी झाल्यानंतर महाराष्ट्र 1 चे मुख्य संपादक निखिल वागळे  रजेवर गेले होते,त्यांना पुन्हा जॉईन होण्यासाठी व्यवस्थापनानेे 2 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली होती,परंतु वागळे जॉईन झाले नाहीत.त्यानंतरही आठ दिवस गेले तरी वागळे महाराष्ट्र 1 मध्ये पाऊल न ठेवल्याने अखेर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
वागळे यांच्या जागी नवा संपादक जॉईन करायचा की आहे त्या टीममधील आशिष जाधव यांना पदोन्नती द्यायची,याबाबत व्यवस्थापन गेल्या काही दिवसांपासून गांभीर्याने विचार करत आहेत.वागळे म्हणजे महाराष्ट्र 1 चा चेहरा होता,असा चेहरा महाराष्ट्र 1 ला सापडत नाही.नविन संपादक घेवून टीम डिस्टर्ब करण्याऐवजी आशिष जाधव यांनाच पदोन्नती देवून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे.