गिरधारी- बाबर वादातूून दोन रिपोर्टरचा बळी

ठाणे - पुढारीची ठाणे आवृत्ती स्वतंत्र निघणार असून,त्यासाठी उपसंपादक आणि रिपोर्टरची भरती करण्यात येणार आहे.दुसरीकडे रिपोर्टर सोनल लाडे आणि स्वप्नाली पवार यांना नारळ देण्यात आला आहे.
पूर्वी ठाणे आवृत्ती मुंबई आवृत्तीच्या अंतर्गत होती.माय ठाणे नावाचे चार पेज दिले जात होते.सोनल लाडे,स्वप्नाली पवार,प्रवीण सोनवणे,नरेंद्र राठोड,अनुपमा गुंडे असे पाच रिपोर्टर काम करत होते.सहा महिन्यापूर्वी ब्युरो चिफ म्हणून विजय बाबर यांची नियुक्ती करण्यात आली.मात्र बाबर आणि संपादक विवेक गिरधारी यांच्यात पटेनासे झाले,त्यातून गिरधारी यांनी बाबर यांना शह देण्यासाठी दिलीप शिंदे यांची चिफ रिपोर्टर म्हणून नियुक्ती करून सर्व अधिकार शिंदे यांना दिले.त्यानंतर बाबर यांनी गिरधारी यांच्यावर मात करून मालक पद्मश्रींकडून सर्व  अधिकार पुन्हा  प्राप्त केले.त्यानंतर बाबर यांनी ठाणे आवृत्ती स्वतंत्ररित्या प्रकाशित करण्याची योजना आखली आणि त्याला पद्मश्रींनी हिरवा कंदील दिला आहे.
दुसरीकडे निष्क्रियतेचा ठपका ठेवून सोनल लाडे आणि स्वप्नाली पवार यांना नारळ देण्यात आला आहे.या दोघी गिरधारींच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.गिरधारी- बाबर यांच्यातील वादातून या दोघींचा बळी गेला आहे.त्याचबरोबर प्रवीण सोनवणे आणि नरेंद्र राठोड देखील रडारवर आहेत.बाबर -  गिरधारी वादातून रिर्पाटरचा बळी दिला जात आहे.सोनल लाडे ही गेल्या दोन वर्षापासून तर स्वप्नाली पवार एक वर्षापासून पुढारीत कार्यरत होती.बातम्या लिहिता येत नाहीत,हा जावाईशोध आताच का लावण्यात आला,असा प्रश्‍न या दोघांना पडला आहे.
धन्य ते पुढारी...धन्य ते गिरधारी आणि धन्य ते बाबर...पुढारीचा चांगभले...