एक पाऊल मागे चॅनेलच्या डॉक्टरने पुन्हा सालाबादाप्रमाणे टूर
काढली आहे. शुगरे आणि काळू मामा या दोन टोळ्यांमधल्या निष्ठावंतांची टूरसाठी निवड करण्यात
आली. शुगरे आणि काळूमामा डॉक्टरचे डावे-उजवे हात. मात्र या दोघांनाही डॉक्टरने कामावरून
काढलं होतं. मग दोन्ही टोळ्यांमधल्या सदस्यांनी डॉक्टरच्या हाता-पायापडून कामावर घ्यायला
भाग पाडलं होतं. तेव्हापासून शुगरे आणि काळूमामा डॉक्टरापासून दुरावले. आता हे दोघेही
डॉक्टरवर जोक करतात. अर्थात सगळेच हा 'विनोद' करण्यात आघाडीवर असतात. तर या थंडीतही काही जणांना घाम फुटला आहे. टूरमध्ये डॉक्टरच्या
बढाया ऐकाव्या लागणार या कल्पनेनेच बरेच जण घामाघूम झाले आहेत.