सरकारनामाचा लवकरच शुभारंभ

पुणे - सकाळ मीडिया ग्रुपचे बहुप्रतिक्षेत राजकीय दैनिक सरकारनामाचा लवकरच शुभारंभ होत आहे.त्याची जोरदार जाहीरातबाजी सध्या सुरू आहे.हे दैनिक निष्पक्ष,निर्भिड आणि सडेतोड राहील,अशी घोषणा सकाळ मीडिया गु्रपने केली आहे.
या दैनिकात कंटेन्ट काय असावेत,त्याचे स्वरूप आणि आकार कसा असावा याबाबतचा आढावा गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे.अखेर अंतिम स्वरूप देण्यात आले असून,हे दैनिक अ‍ॅग्रोवन आकाराप्रमाणे 16 पानी राहणार आहे.
त्यात फक्त आणि फक्त राजकीय बातम्या राहणार आहेत.त्याचबरोबर दिल्ली,मुंबईसह वार्तापत्रे,पडद्यामागच्या हालचाली,काही विशेष सदरे राहणार असल्याची प्राथमिक माहिती बेरक्याच्या हाती लागली आहे.या दैनिकावर वाचकांच्या उड्या पडतील,अशी तयारी सकाळ मीडिया ग्रुपने केली आहे.

बा आदब,! बा मुलाहिजा !! होशियार !!!
लवकरच 'सरकारनामा' येतोय ....