मुंबई - निखिल
वागळे गेल्यानंतर महाराष्ट्र 1 मध्ये गळती सुरू झाली आहे.दिल्ली प्रतिनिधी
अमेय तिरोडकर याने राजीनामा दिला असून,पुण्याची रिपोर्टर अश्विनी सातव -
डोके राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.त्याचबरोबर अनेक रिपोर्टर आणि अँकर
दुसर्या चॅनलच्या शोधात आहेत.21 डिसेंबर उजाडला तरी नोव्हेंबर महिन्याचे
पगार न झाल्यामुळे महाराष्ट्र 1 चे सर्व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.
महाराष्ट्र 1 चॅनल वर्षपुर्ती होण्याअगोदरच आर्थिक डबघाईस आले आहे.गेल्या काही महिन्यापासून कर्मचार्यांंचे पगार वेळेवर होत नाहीत.नोव्हेंबरचा पगार अद्याप झाला नाही.पगार वेळेवर होत नसल्यामुळे सर्व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.व्यवस्थापन पुर्णपणे ढासाळले आहे.आर्थिक ताणाताण सुरू झाल्याने निखिल वागळे पाठोपाठ आता दिल्ली प्रतिनिधी अमेय तिरोडकर याने राजीनामा दिला आहे.याच कारणामुळे पुण्याची रिर्पाटर अश्विनी सातव - डोके राजीनामा देण्याच्या तयारीत आहेे.
महाराष्ट्र 1 चॅनलला आर्थिक पार्टनर हवा आहे.कोल्हापूरच्या एका गुटखा विक्रेत्यास घोड्यावर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला,परंतु टांगा पलटी करून घोडा पसार झाला आहे.वागळेंच्या जागेवर आलेले कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना दिवसभरात कोणते शो चालावावेत,कोणत्या वेळी कोणत्या बातम्या घ्याव्यात,याचे नियोजन जमत नसल्याचे दिसून येत आहे.आजचा सवाल हा डिबेट शो अत्यंत भंगार होत आहे.या शोचा टीआरपी पार ढासळला आहे.कंटेंन्ट नसल्यामुळे चॅनलचाही टीआरपीही पार घसरला आहे.त्यामुळे महाराष्ट्र 1 चॅनलचे भवितव्य दिवसेंदिवस अंधकारमय होत आहे.