मुंबई - मोदी सरकारने 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रूपयाच्या नोटावर बंदी घातल्यानंतर सर्वच क्षेत्रात मंदीची लाट आली आहे.नोटाबंदीमुळे बाजारातील उलाढाल निम्मावर आली असून,यामुुळे अनेकजण त्रस्त झाले आहे.नोटाबंदीचा निर्णय चांगला असला तरी,प्रचंड चलन तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांनी हात आखडता घेतला आहे.दुसरीकडे नोटाबंदीचा जबरदस्त फटका मीडियालाही बसला आहे.
आघाडीचे दैनिक लोकमत,सकाळ,पुण्यनगरी,महाराष्ट्र टाइम्स,दिव्य मराठी,पुढारी,लोकसत्तासह अनेक वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवसायावर परिणाम झाला असून,सर्वच वृत्तपत्रांनी आपल्या मुख्य अंकाच्या पानाची संख्या कमी केली आहे.पुण्यात सकाळ नंबर 1 असूनही जाहिरात व्यवसाय घटल्याने सकाळने पाने कमी केली आहेत.त्याचबरोबर सरकारनामाचे लॉचिंग पुढे ढकलले आहे.औरंगाबाद,नागपूर,नाशिकमध्ये लोकमत नंबर 1 वर आहे,परंतु पानाची संख्या कमी करावी लागली आहे,कोल्हापूरात पुढारी नंबर 1 आहे,परंतु पुढारीनेही पाने कमी केली आहेत.त्याचबरोबर पुढारीच्या औरंगाबाद आवृृत्तीचे लॉचिंग पुढे ढकलण्यात आले आहे.अनेक वृत्तपत्रांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून,नव्या वर्षात अनेकांना घरी बसावे लागणार आहे.
नोटाबंदीचा फटका टीव्ही मीडियासही बसला आहेे.50 टक्के जाहिराती कमी झाल्याने अनेक चॅनलनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचबरोबर अनेक शो बंद केले आहेत.नोटाबंदीमुळे महाराष्ट्र 1 आणि जय महाराष्ट्र चॅनल आर्थिक संंकटात सापडले आहे.