मुंबईत
आक्रितच घडलं आणि पोलिसांना नाकबंदीत चक्क सापडलं 'मंगळावरचं पाणी'... मराठी
वृत्त वाहिन्यांच्या जगात 'जग जिंकायला' निघालेल्या कंपूतील एक महिला अँकर मंगळ
ग्रहावरील पाणी मराठवाड्यात आणायला निघाली होती. तेव्हापासून तिची ओळख '
मंगळावरचं पाणी' पाजणारी म्हणून सगळ्यांना ठाऊक.
तर सांगायचा मुद्या
म्हणजे गेल्या महिन्यातल्या
शेवटच्या आठवड्यात ही पाणीवाली अँकर सकाळच्या शिफ्टला आली आणि संध्याकाळी
4ला दिवस भरून मुंबईच्या दक्षिण टोकाला रवाना झाली. तिथं मनोरंजनाचा
कार्यक्रम झाला आणि परतताना नाकाबंदी लागली. यावेळी तिने गाडी नाकाबंदीत
घातली तसे
पोलिसांना वास आला असता पोलिसांनी गाडी बाजूला घ्यायला लावली.
मग झाली पंचाईत. कारण, तोवर सोबत्यांची परेड सुरु झाली होती. दक्षिण मुंबईत
मनोरंजनचा कार्यक्रम करताना नवरा सोबत होता. पण, पोलिसांनी बाजूला घेतले
तेव्हा सोबत असलेल्या दोन्ही पुरुषांपैकी कुणीच नवरा नव्हता. मग मंगळावरचं
पाणी घाबरले.आणि देवाचा धाव सुरु झाला तसेच ओळखीच्या
रिपोर्टर्सलाही फोनाफोनी सुरु झाली. मंगळावरच्या पाणीवालीचे बाबाच आहेत
पोलीस... घरी नवरोबाला सांगितलं तर अजून बोम्बाबोम्ब
झाली असती.शेवटी मदत मिळाली ती, आता जग बदलेल असा दावा
करणाऱ्यांच्या कंपूतल्या झुरळाकडून. दोस्तीसाठी चॅनेल न पाहता हे झुरळ
जोरीनं मदतीसाठी धाऊन गेलं. नमस्कार ,चमत्कार करून, जग बदलायची ताकद लावून
'मंगळावरचं पाणी' अँकरला 'ड्रंक अँड ड्राईव्ह' प्रकरणामधून सोडवायला झुरळ
अखेर उपयोगी पडले. इतकं केल्यावर बॅलन्स गेलेल्यांची डिलीवरी पण करायची
जबाबदारी
पार पाडली गेली. पण, जे झालं त्यानंतरही मंगळावरचं पाणी नाक वर करून
जणू काही घडलंच नाही असे वागत आहे.झुरळ आणि मंगळावरच्या पाण्यात आता
चांगेलच पाणी मुरत आहे...