
सप्टेंबर २०१५ रोजी उस्मानाबाद येथील नीरज गॅस एजन्सीजवळ राम खटके यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती काही प्रमाणात सुधारली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यापासून त्यांची प्रकृती खालावली. मंगळवारी त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ, बहीण, असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ लिखाण धारदार होते. शासकीय कार्यालयासह राजकीय बातमीदारीत त्यांचा हातखंडा होता. त्यासाठी 'दिव्य मराठी'कडून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.