*स्थानिक पोलिसांनी वकीलसाहेबांना अंधारात ठेवले; चार गंभीर गुन्हे दाखल
असलेला हद्दपारीचा गुन्हेगार बसला निकमसाहेबांच्या मांडीला मांडी लावून!!*
उस्मानाबाद
। उस्मानाबाद जिल्हयात तीन ते चार पत्रकार संघ आहेत. पैकी कुठेही
नोंदणीकृत नसलेल्या उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पत्रकार
पुरस्कार वितरण कर्यक्रम नुकताच पार पडला. त्यात प्रमुख पाहुणे उज्ज्वल
निकम यांच्याशेजारी बसण्यावरून अध्यक्ष आणि सचिवात तू-तू, मै-मै झाल्याची
चर्चा आहे. पूर्वी अध्यक्ष असलेला आता सचिव झाला आहे, त्याच्यावर चार गंभीर
गुन्हे आहेत, त्यास मागे पोलिसांनी हद्दपारीची नोटीस दिली होती, परंतु तो
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या शेजारी बसल्याने आश्चर्य व्यक्त
केले जात आहे. पोलिसांनी याबाबत निकम यांना माहिती दिली नसल्याने
पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
विशेष
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या शेजारी बसण्यासाठी सचिवाने
अध्यक्षाबरोबर हमरीतुमरी केल्याची चर्चा आहे. निकम यांना आणण्यासाठी आणि
मागे पुढे करण्यासाठी तो पुढे-पुढे करत होता, त्याची ही चमकोगिरी सर्वाना
खटकत होती.
दुसरे असे की,
पुरस्कार जाहीर करून दोन वर्ष लोटले तरी त्याचे वितरण नव्हते, अखेर हे
वितरण झाले; पण पुरस्कारप्राप्त पत्रकांराना जेवण तर सोडा साधे चहापानही
करण्यात आले नाही, त्यांची राहण्याची आणि जेवण्याची सोय तर दूरच,
तसेच
हा पत्रकार संघ नोंदणीकृत नसताना शासनाचा भूखंड लाटला आहे, तसेच
बेकायदेशीर देणग्या उकळल्या आहेत, हा पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषदशी
सलग्न होता, पण तो मराठी पत्रकार परिषदेला कधी विचारत नाही किंवा मराठी
पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांस बोलवत नाही, मराठी पत्रकार परिषदचे
पदाधिकारीही मूग गिळून गप्प आहेत.