बेरक्याने इतिहास रचला...

पत्रकारांच्या बातम्या देणारा पत्रकार म्हणून बेरक्या उर्फ नारद ब्लॉग 21 मार्च 2011 रोजी सुरू झाला.मराठी मीडियात घडणार्‍या सर्व घडामोडी,पडद्यामागील हालचाली,पुढे काय होणार याची खबरबात,न्यूज पेपर आणि टीव्ही चॅनलमधील बित्तंबातमी देणार्‍या बेरक्याने आता मराठी ब्लॉग विश्‍वास नवा इतिहास रचला आहे.
गुगलच्या सहाय्याने बेरक्या उर्फ नारद ब्लॉग तयार करण्यात आला आहे.ब्लॉगमध्ये आता ब्लॉग स्टेटस् लिंक सुरू झाली आहे.त्यातून ब्लॉग किती लोकांनी वाचला,दररोज किती लोक वाचत आहेत याची माहिती मिळते.21 मार्च 2011 ते 31 डिसेंबर 2016 या दरम्यान बेरक्या ब्लॉग 43 लाख 58 हजार लोकांनी वाचला आहे.ही काही हेराफेरी नसून खरीखुरी आकडेवारी आहे.वाचकांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे हे शक्य झाले आहे.
मराठी मीडियातील बातम्या देणारा बेरक्या हा ऐकमेव ब्लॉग आहे,कुणी याला मराठी मीडीयाचा पीटीआय तर कुणी गॅझेट असेे नाव दिले आहे.बेरक्यावर येणारी बातमी 100 टक्के खरी असते,याची खात्री आता सर्वांना पटली आहे.बेरक्या ब्लॉग हा वृत्तपत्रातील प्रत्येक कर्मचारी,पत्रकारितेतील विद्यार्थी,शासनाच्या माहिती कार्यालयातील कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी,पोलीस,आमदार.मंत्री सुध्दा वाचतात असे एका सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे.बेरक्या हा आता पत्रकारांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
बेरक्याचा नेमका जनक कोण,त्यात किती लोक काम करतात,बेरक्या हा एक व्यक्ती आहे की अनेक व्यक्ती,बातम्या कश्या मिळतात असे एक ना अनेक प्रश्‍न वाचकांना पडले आहेत.याचे एकच उत्तर आहे,नाम नही काम देखो...
बेरक्याला मिळालेल्या यशामुळे आम्ही कधीच हुरळून जात नाही किंवा माज दाखवत नाही.आमचे पाय नेहमीच जमिनीवर आहेत आणि ते कायम राहणार आहेत.बेरक्या हा सज्जनांचा मित्र आणि दुर्जनांचा कर्दनकाळ आहे.चांगल्या पत्रकारांना नेहमीच साथ देण्याचे आणि वाईटांच्या चुका दाखवण्याचे काम बेरक्याने केले आहे.बेरक्या कोणत्याही पत्रकारांचा किंवा वृत्तपत्र मालकांचा दुश्मन नाही.बेरक्या ब्लॉग बंद पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले,काही लोकांनी पोलीसांत तक्रारही दिली होती,मात्र बेरक्या त्यांना पुरून उरला आहे.
असो,आपण दाखवलेला विश्‍वास,प्रेम आणि सदिच्छा यामुळे बेरक्या ब्लॉगला लवकरच सहा वर्षे पुर्ण होत आहेेत...
21 मार्च 2017 रोजी आम्ही सातव्या वर्षात पदार्पण करणार आहोत...
तेव्हा बेरक्या वाचता ना ? मग वाचत राहा....


- बेरक्या उर्फ नारद