वाचकांना बक्षीसांची लालूच

औरंगाबादमध्ये सध्या पेपरवॉर सुरू झाले आहे. यातूनच वाचकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढविणे सुरू आहे. पुण्यनगरीप्रमाणेच पुढारी आणि लोकमतनेही बक्षीस योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे लाखोंची बक्षीसे यात ठेवण्यात आल्याने वाचकांचीही चांदी होणार आहे. कारपासून फ्लॅटपर्यंत बंपर लॉटरी भाग्यवान वाचकांना लागणार आहे. पुण्यनगरी कायम अशी बक्षीस योजना चालवते. त्यामुळे पुण्यनगरीच्या खपात राज्यात लक्षणीयरित्या वाढ होत गेली. हा फंडा नंतर इतर वृत्तपत्रांनीही गिरवायला सुरुवात केली. पुढारीने औरंगाबादेत पाऊल ठेवल्याबरोबर बक्षीस योजना जाहीर केली. यातून पुढारीशी किती वाचक जोडले जातील, हे बघणे उत्सुकतेचे राहणार आहे. पुढारी आल्यानंतर पुण्यनगरी, सकाळचा वाचक तुटेल, असे बोलले जात होते. मात्र पुण्यनगरीला फारसा फरक पडला नाही. पुढारी अवघ्या दोन रुपयांत उपलब्ध आहे तर सर्वाधिक qकमत सध्या बाजारात पुण्यनगरीची आहे. चार रुपये पुण्यनगरीसाठी मोजावे लागतात. तरीही पुण्यनगरीचा खप कमी झालेला नाही, हे विशेष.
रंगारंदुनिया
सर्वच मोठ्या वृत्तपत्रांनी सर्वच्या सर्व पाने रंगीत केली असून, पान १ पासून शेवटपर्यंत रंगीत पाने वाचायला मिळत आहे. पूर्वी पुण्यनगरीची काही पाने कृष्णधवल असायची. आठ दिवसांपासून पुण्यनगरीने सारीच पाने रंगीत केली आहेत. पानांच्या संख्येत सध्या दिव्य मराठी आणि पुण्यनगरी पुढे आहे. २४ पानांचे वृत्तपत्र सध्या हे दोन्ही वृत्तपत्र देत आहेत. तर सकाळ आणि लोकमत २० पानांचा आहे.
पुढारीचा मजकुराचा दर्जा सुमार
पुढारीचा तथाकथित तज्ज्ञ बसलेले असले तरी, मजकुराचा दर्जा मात्र अत्यंत सुमार असाच आहे. पुढारीत प्रकाशित अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊन गंमतीचा भाग बनत आहेत.

दिव्य मध्ये पुन्हा 'दिव्य'...
मराठी वृत्तपत्रात हिंदी हेडलाईन ...