मुंबई - डबघाईला आलेल्या मी मराठी आणि
लाइव्ह इंडिया चॅनलची अखेर विक्री झाल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली
आहे,मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
महेश मोतेवार जेलमध्ये गेल्यापासून मी मराठी आणि लाइव्ह इंडिया चॅनलला घरघर लागली आहे.चॅनल आर्थिक डबघाईस आल्यामुळे दोन वेळा किमान एक महिना बुलेटिन बंद झाले होते.काही महिन्यापुर्वी विजय शेखर यांनी सूत्रे हाती घेवून हे चॅनल नवख्यावर रडतपडत सुरू केले होते.डबघाईला आलेले हे चॅनल बिहारमधील एका भाजप नेत्याने खरेदी केल्याचे कळतय.मी मराठी आणि लाइव्ह इंडिया हे दोन्ही चॅनलचा व्यवहार काही कोटीमध्ये झाला असून लवकरच नव्या प्रशासनाकडे हे चॅनल जाणार असल्याची माहिती आहे.
चॅनल विक्री करताना राजेश शर्मा,विजय शेखर आणि लविना फर्नाडिस या त्रिकूटाने आपले स्थान मजबूत केले आहे मात्र ज्यांनी चॅनलसाठी अनेक वर्षे खस्ता खाल्ला ,6 महिने ते 1 वर्षे पगार न घेता राजीनामा दिला, त्यांचे काय ? त्यांचा पगार मिळणार का ? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीय आहे.थकीत पगार न देल्यास सर्व माजी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचे कळते.