आयबीएन - लोकमत चॅनलचे नाव बदलणार

मुुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे  नेटवर्क 18  कंपनीचे चे सर्व हक्क आल्यानंतर या कंपनीअंतर्गत चालणारे हिंदी न्यूज चॅनल आयबीएन 7 चे नाव आणि न्यूज इंडिया करण्यात आले आहे.त्यानंतर या कंपनीअंतर्गत सुरू असलेल्या सर्व अठरा चॅनलचे नामांतर करण्यात येत आहे.आता मराठीत सुरू असलेल्या आयबीएन - लोकमतचे नावही बदलण्यात येणार असून ते न्यूज इंडिया मराठी असे राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे
विशेष म्हणजे आयबीएन ही कंपनी आता अस्तीत्वाच नाही तरीही आयबीएन - लोकमत हे चॅनल सुरू आहे.आयबीएन 7 चे नाव न्यूज इंडिया नामांतर करण्यात आल्यानंतर आयबीएन - लोकमतचे नावही बदलण्यात येणार होते,परंतु राज्यात होणार्‍या नगर पालिका,महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नामांतर करण्याचे तीन महिने  पुढे ढकलण्यात आले आहे.मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवडयात आयबीएन - लोकमतचे नाव बदलण्यात येणार आहे.
दुसरे महत्वाचे म्हणजे नेटवर्क 18 ने लोकमतबरोबरची भागिदारीही तोडली असून सध्या लोकमतचा या चॅनलबरोबर आर्थिक संबंध नाही.केवळ जुन्या संबंधामुळे हे नाव टिकून आहे.