औरंगाबाद - औरंगाबादेत अखेर पुढारी सुरू झाला आहे.मराठी पत्रकार दिन अर्थात दर्पण दिनाच्या मुहूर्तावर पुढारी सुरू झाला असून कोणत्याही मान्यवरांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन न करता तो वाचकांच्या हाती देण्यात आला आहे.केवळ दोन रूपये अंकाची किंमत असलेल्या पुढारीबद्दल वाचकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत.
गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर पुढारी यंदा सुरू होणार हे गृहीत होते,परंतु अनेक अडथळे आले.नोटाबंदीमुळे पुढारीचे लॉचिंग पुन्हा लांबले होते.अखेर अडथळ्याची ही शर्यत पार करून पुढारी वाचकांच्या हाती पडला आहे.
औरंगाबाद शहर,औरंगाबाद ग्रामीण,जालना आणि बीड या चार आवृत्त्या पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आल्या आहेत.स्थानिक विशेषतः राजकीय आणि क्राईम बातम्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.दोन रूपयात 16 पानापेक्षा जास्त पाने देता येत नाहीत म्हणून औरंगाबाद शहर आवृृत्ती 12 + 4 सुरू आहे.सोबत जाहिरात मजकूर असलेली पुरवणी देण्यात येत आहे.स्वागत मूल्य दोन रूपये असून भविष्यात पुढारीची किंमत तीन किंवा चार रूपयेे राहणार आहे.
औरंगाबाद आवृत्ती आपण ऑनलाईन पाहू शकता...
http://newspaper.pudhari.com/