चांगल्या समाजासाठीवाल्या चॅनेलची सध्या भंबेरी उडालीय. या चॅनेलवर काही
दिवसांपूर्वी मुंबईतील एका नामांकित पारशी कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या
हॉस्पीटल विरोधात एक बातमी केली होती. ही बातमी चुकीची असल्याचा मसेज
"ढोकळ्या"पर्यंत पोचवला होता. पण जे होईल ते बघू या अविर्भावात ही बातमी ऑन
एअर गेली. मात्र नंतर याबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून भोईवाडा पोलीस
स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.याबाबत भोईवाडा पोलिस पोचले थेट चांगल्या
समाजासाठीमध्ये. आता ढोकळ्यासह सर्वांना घाम फुटला. म्हणे ही पेड न्युज
असल्याचं चॅनेलनं मान्य केलयं. आणि ज्याच्या बाजूने ही बातमी केली तो म्हणे
हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि युनियन यांच्यातील वादातील आरोपी आहे.