मुंबई
- व्हेंटिलेटरवर असलेल्या जनशक्तिमध्ये अखेर कार्यकारी संपादक पुरुषोत्तम
आवारे पाटील यांची विकेट पडली आहे. 'आवारे पाटलांच्या डोक्यावर तुळशीपत्र'
ही बातमी बेरक्याने काही दिवसापूर्वी प्रसिद्ध करून आवारे पाटील यांची
विकेट पडणार हे भाकीत व्यक्त केले होते, अखेर घडलेही तसेच...
आवारे पाटलांच्या हाती मालकांनी नारळ दिला असून आवारे पाटील प्रहारच्या नितेश राणेंच्या दरबारात गेले होते, पण तेथे अगोदरच जावून बसलेल्या बाबरानी खिंड आडवून ठेवली आहे. नवीन संपादक तुळशीदास भोईटे आणि आहे तो कर्मचारी वर्ग यांचेही जमेनासे झाले आहे.एका डीटीपी ऑपरेटर बरोबर भोईटे यांचे चांगेलच वाजले. हा ऑपरेटर निघाला मालकाच्या जवळचा.. मालक कुंदन ढाके जेंव्हा ऑफिसमध्ये आले तेंव्हा भोईटे यांनी एक तर हा ऑपरेटर राहील किंवा मी राहील, अशी भीष्मप्रतिज्ञा केली, मालकाने सरळ सांगितले, हा ऑपरेटर राहील, ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे.. बिचाऱ्या भोईटे यांची भीष्मप्रतिज्ञा हवेत विरली. नाराज भोईटे दुसरीकडे शोधाशोध करू लागले आहेत. पेपर बरोबर भोईटेही व्हेंटिलेटरवर आहेत.