मराठी पत्रकार परिषदेचे स्वयंघोषित अध्यक्ष एस. एम. देशमुख मूळ 
बीडचे.. त्याच्यांच जिल्हयात एस. एम. यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी 
पत्रकारांत कधी भांडणे लावली, याचा लेख बीडच्या एका पत्रकारांने स्वतःचे 
नाव न लिहिता बेरक्याकडे पाठवला आहे.. एस.एम. यांचे पाय स्वतःच्या 
जिल्हयातच खोलात आहेत, 
मागील काही पोस्टचे उत्तर एस. एम. यांनी बेरक्याकडे पाठवले नाही. या पोस्टचे उत्तर ते देतील ही अपेक्षा. त्यांनी उत्तर दिल्यास ते प्रसिद्ध केले जाईल. या पोस्टशी बेरक्याचा काहीही संबंध नाही. बेरक्या म्हणजे एस. एम. देशमुख आहेत असा जो गोड गैरसमज त्यांचे काही मूठभर समर्थक करत होते, त्यामुळे ही पोस्ट आम्ही प्रसिद्ध करत आहोत. बाकी आमचा काहीही इंटरेस्ट नाही.
बेरक्या कोणत्याही व्यक्ती किंवा मालक यांच्या विरोधात नाही . कृपया याची नोंद घ्यावी...
...........................................................
मागील काही पोस्टचे उत्तर एस. एम. यांनी बेरक्याकडे पाठवले नाही. या पोस्टचे उत्तर ते देतील ही अपेक्षा. त्यांनी उत्तर दिल्यास ते प्रसिद्ध केले जाईल. या पोस्टशी बेरक्याचा काहीही संबंध नाही. बेरक्या म्हणजे एस. एम. देशमुख आहेत असा जो गोड गैरसमज त्यांचे काही मूठभर समर्थक करत होते, त्यामुळे ही पोस्ट आम्ही प्रसिद्ध करत आहोत. बाकी आमचा काहीही इंटरेस्ट नाही.
बेरक्या कोणत्याही व्यक्ती किंवा मालक यांच्या विरोधात नाही . कृपया याची नोंद घ्यावी...
...........................................................
स्वत:च्याच बीड जिल्ह्यात लाथाडले गेल्याने आता पत्रकारांत फोडा-फोडीचा प्रयत्न
-एस.एम. नव्हे “शेम”sss“शेम”sss देशमुख म्हणाव्या अशाच कुरापती!
महाराष्ट्रात
 पत्रकारांचे जणू आपणच एकमेव कैवारी किंबहुना उद्धारकर्ते आहोत, अशा थाटात 
नेतेगिरी करत फिरणाऱ्या एस. एम. देशमुख यांचा खरा चेहरा आता गेल्या काही 
दिवसात त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर येत असलेल्या लिखाणामुळे सर्वांसमोर 
उघड होऊ लागला आहे. (त्यांच्याशी संबंध आलेले अनेक जण त्यांचा खरा चेहरा 
ओळखून आहेत. पण आता हळू-हळू तो सर्वांसमोरही येत आहे.) एकीकडे 
पत्रकारांच्या भल्याच्या, एकजुटीच्या गप्पा मारायच्या अन् दुसरीकडे 
पत्रकारांत भांडणे लावण्याचा, फोडाफोडीचा प्रयत्न करायचा! हा या “शेम” 
देशमुख यांचा खरा धंदा!
मराठवाड्यातील
 बीड जिल्हा पत्रकार संघ हा तसा एक चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या 
संघटनापैकी कायदेशीरपणे नोंदणीकृत असा संघ! गेल्या अनेक वर्षांपासून हा संघ
 कार्यरत आहे. या संघाकडून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारास स.मा. गर्गे 
पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. आतापर्यंत भारतकुमार राउत, मधुकर 
भावे, द्वारकानाथ संझगिरी, सुधीर गाडगीळ, निखील वागळे,  राजीव खांडेकर अशा 
अनेक ज्येष्ठ पत्रकारांना या बीड पत्रकार संघाने सन्मानित केले आहे. 
यावर्षी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना या पुरस्काराने सन्मानित 
करण्यात आले. खा. शरद पवार, पालकमंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह
 इतर मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा देखणा सोहळा पार पडला.
आता
 नेमक्या याच कार्यक्रमामुळे पत्रकारांचे (?) “नेते” एस.एम. देशमुख यांच्या
 पोटात दुखू लागले आहे. झाले असे की, बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या 
पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात एस. एम. देशमुख यांना दूर ठेवणेच पसंद केले.
 हा संघ देशमुख यांच्याशी संबंध ठेऊन होता, पण देशमुख यांचा या संघातील 
पदाधिकाऱ्यांमध्ये फुट पाडून हा संघ आपल्या वर्चस्वाखाली घेण्याचा सुप्त 
हेतू लक्षात येताच या संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मग देशमुख यांना 
आपल्या कार्यक्रमापासून दूर ठेवणेच उचित मानले. राज्याच्या प्रत्येक 
जिल्ह्यात आपले कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने आहेत, हे दाखवून 
शासनाची विविध पदे मिळवण्यासाठी हे देशमुख महाशय असे प्रकार गेल्या अनेक 
वर्षांपासून बिनबोभाटपणे करीत आहेत.
पण,
 आपल्याच जिल्ह्यात झालेल्या या कार्यक्रमात आपल्याला अशाप्रकारे 
लाथाडण्यात आल्याने देशमुख यांचा जास्तच जळफळाट झाला; आपल्याच जिल्ह्यात 
झालेल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात, इतक्या मोठ-मोठ्या नेत्यांसमोर 
नेता म्हणून मिरवता आले नाही याची सल त्यांना बोचू लागली. आणि त्यामुळेच 
त्यांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांत भांडणे लावण्यासाठी फोडाफोडी सुरु केली
 आहे. नोंदणीकृत असणारा बीड जिल्हा पत्रकार संघ कार्यरत असताना या देशमुख 
यांनी काही जणांना ‘उचकवून’ आता जिल्ह्यात दुसरा एक पत्रकार संघ स्थापन 
केला आहे. इतके दिवस जुना संघच आपला संघ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न 
करणाऱ्या देशमुख यांना लाथाडले जाताच आता दुसरा संघ स्थापन करावा वाटला 
आहे.
एकीकडे पत्रकार 
एकजुटीच्या गप्पा मारत राज्यातील पत्रकारांना भूलवत विविध पदं लाटत राहायची
 अन् दुसरीकडे स्वत:च्याच जिल्ह्यात एक नोंदणीकृत असा जिल्हा पत्रकार संघ 
कायदेशीरपणे कार्यरत असताना दुसरा संघ स्थापन करून पत्रकारांत भांडणे 
लावण्याचा प्रयत्न करण्याची ही वृत्ती अत्यंत किळसवाणी अशीच आहे. असेच 
प्रकार देशमुख हे अनेक ठिकाणी करीत असतात. प्रत्येक जिल्ह्यात आपले पत्रकार
 कार्यकर्ते आहेत, आपणच पत्रकारांचे नेते आहोत, असे दाखवून; शासनाची, 
संघटनेची विविध पदे उपभोगण्यासाठी देशमुख यांच्यासारख्या पत्रकाराकडून (?) 
सुरु असलेले हे प्रकार म्हणजे “शेम” देशमुख म्हणावे असेच आहेत. एक गेले तर 
दुसरे असावे अन् दुसरे गेले तर तिसरे असावे म्हणून एकाच वेळी विविध 
संघटनांची विविध पदं देशमुख यांनी आपल्या बुडाखाली ठेवलेली आहेत. विविध 
पत्रकार संघटनांचा राज्य पातळीवरही त्यांनी “शेम”sss“शेम”sss म्हणावा असाच 
धंदा बनवून टाकला आहे. आपल्याशिवाय इतर कुणाला कामच करता येऊ नये किंवा 
करूच दिले जाऊ नये असा देशमुख यांचा दुष्ट हेतू यातून स्पष्ट होतो. या 
देशमुखांनी आता अगदी हास्यास्पदरित्या पारदर्शकतेच्याही गप्पा सुरु केल्या 
आहेत. पण सतत मराठी पत्रकार परिषदेची आणि इतरही संघटनांची महत्वाची पदं 
लाटत आलेले देशमुख, कित्येक वर्षात शासनाकडून तसेच राज्यातील विविध पत्रकार
 संघ यांच्याकडून गेल्या किती- किती रकमा उकळल्या आणि त्याचे काय- काय 
केले? हे मात्र उघडपणे सांगायचे टाळतात.
त्यांच्याच जिल्ह्यात ते करीत असलेल्या फोडाफोडीच्या कुरापतीचे धंदे सर्व पत्रकारांना कळावेत म्हणून हा पत्र प्रपंच!
-एक सामान्य पत्रकार, बीड.
 


 
 
 
