औरंगाबाद - पोलीस आयुक्ताविरूध्द बातम्या दिल्यास तुमचा सुनील ढेपे करण्यात येईल,अशी धमकी एका पोलीस निरीक्षकानी दिल्यामुळे औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील पत्रकारांत तिव्र संताप व्यक्त केला जातोय.धमकी देणार्या पोलीस निरीक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कारभाराविरूध्द सर्वच वृत्तपत्रांत गेल्या काही दिवसांपासून बातम्या झळकत आहेत,त्याचा राग अनावर झालेल्या एका पोलीस निरीक्षकांने पत्रकारांना चांगलेच धमकावले.काही क्राईम रिपोर्टर पोलीस आयुक्त कार्यालयात बातम्यांच्या निमित्ताने गेले असता,क्राईम ब्रॅन्चच्या एका पोलीस निरीक्षक त्यांना उद्देशून,तुमची संपूर्ण कुंडली आमच्याकडे असते,उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांना पोलीसांनी कसे खोट्या गुन्ह्यात गोवले तसे तुुम्हाला गोवू, ढेपेंच्या प्रकरणात काय झाले ? तसे आमचे काही होवू शकत नाही.तेव्हा याद राखा आणि पोलीस आयुक्ताविरूध्दच्या बातम्या थांबवा,अशी धमकी दिली.
त्यांची ही धमकी ऐकताच,पत्रकारांत संतापाची लाट उसळली आणि अनेक पत्रकार पोलीस आयुक्तांच्या व्हाटस् अॅप गु्रपमधून लेफ्ट झाले.नंतर या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी,पत्रकार आणि पोलीस यांचे संबंध ताणले गेले आहेत.
काय आहे सुनील ढेपे प्रकरण ?
उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांनी पोलीसांविरूध्द बेधडक बातम्या दिल्या असता,पोलीसांनी षडयंत्र रचून सप्टेंबर 2016 मध्ये त्यांच्या कार्यालयावर गुंडाला हल्ला करण्यास सांगितले,त्यानंतर गुंडावर कारवाई करण्याऐवजी सुनील ढेपे यांना खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकाविले,त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते.याप्रकरणी सुनील ढेपे यांनी याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन दाखल केले असून,हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
गुंडाच्या मार्फत हल्ला करणे आणि उलट गुंडाच्या बाजू घेवून पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकावणे असा प्रकार पोलीसांनी सुरू केला असून,आता पत्रकारांनी एक होण्याची गरज आहे.