अमरावती जिल्ह्यातील पत्रकार
प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी या दोन्ही पत्रकाराचा जामीन अर्ज जिल्हा
न्यायालयाने बुधवारी मंजूर केला आहे गुरुवारी या दोघांची सुटका होईल.
चांदुर रेल्वे या ठिकाणी एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणी आरोपीस अटक करावी म्हणून एक जमाव पोलीस स्टेशनवर चालून गेला असता पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला होता. नंतर या घटनेचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी यांच्यावर धार्मिक भावना भडकवणे, जातीय तेढ निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्यास पोलीस कस्टडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी झाली होती.
निरपराध पत्रकार प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल होताच, बेरक्याने आवाज उठवला. पत्रकार जागृत झाले, ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. अखेर या दोघांचा जमीन झाला. हा पत्रकार एकजुटीचा विजय आहे. आता खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. यासाठी पत्रकारांनी पुढील लढा चालू ठेवणे गरजेचे आहे.
राज्यात काही पत्रकार संघटना दुकान मांडून बसल्या आहेत. या संघटना शेपूट घालून बसल्या. अश्या संघटनेत पत्रकारांनी सहभागी होवू नये. दुकान मांडून वसुली करणाऱ्या संघटनेची माहिती बेरक्याला कळवा, त्याची दखल घेतली जाईल.