टीव्ही 9 ( मराठी ) चे 
सल्लागार संपादक म्हणून निखिल वागळे १ मे रोजी जॉईन झाले होते. त्यांना 
अवघ्या तीन महिन्यात चॅनेल सोडावे लागले. पाठोपाठ कुमावत याना अवघ्या एक 
महिन्यात चॅनल सोडावे लागले आहे . तत्पूवी आऊटपुट हेड अभिजित कांबळे आणि 
इनपुट हेड प्रीती सोमपुरा यांनाही चॅनल सोडावे लागले आहे. वागळे यांचे कारण
 सध्या चर्चेचा विषय झाला असताना कुमावत यांच्याबद्दल सध्या मीडियात  मोठे 
गॉसिफ सुरु आहे.
नेमके काय घडले ?
टीव्ही 9  ग्रुप मध्ये सल्लागार
 म्हणून विनोद कापरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कापरी यांनी यापूर्वी
 इंडिया टीव्ही आणि न्यूज एक्स्प्रेस मध्ये संपादक म्हणून काम केले आहे. 
तीच कार्यपद्धती त्यांनी टीव्ही 9 मध्ये सुरु केली आहे. त्यामुळे कुमावत 
त्रासून गेल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे कुमावत यांनी  राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. 
दुसरीकडे त्यांच्याबद्दल एक गॉसिफही  तिखट मीठ लावून चर्चेले जात असून त्यातूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे मीडियात चर्चा सुरु आहे. 
"खरे"  खोटे  कुमावत यांनाच माहित आहे. कुमावत यांनी खुलासा केल्यास तो खुलासा बेरक्यावर प्रसिद्ध केला जाईल. 
कुमावत आपल्या राजीनाम्याबद्दल खुलासा करणार का ?
कुमावत आपल्या राजीनाम्याबद्दल खुलासा करणार का ?
 

 
 
 
