मुंबई - इंग्रजी वर्तमानपत्रात काम करणाऱ्या एका महिला पत्रकाराचा
सोमवारी रात्री विलेपार्ले येथे विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा
धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक
केली आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता त्याची पोलीस कोठडीत
रवानगी करण्यात आली आहे.
३० वर्षीय महिला पत्रकार विलेपर्ले येथे नातेवाईकांकडे गेली होती. तिथून एम. जी. रोडवरून विलेपार्ले रेल्वे स्टेशनकडे चालत जात असताना या तरुणाने तिला मागून धक्का दिला व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पत्रकार महिलेने मोठ्या धाडसाने प्रतिकार करत तरुणाला पकडून जवळच्याच पोलीस चौकीत नेले. चौकीत ड्युटीवर असलेल्या कॉन्स्टेबलने पोलीस व्हॅनला पाचारण करून नंतर या तरुणाला विलेपार्ले पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर पत्रकार महिलेने या तरुणाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी भा.द.वि. कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव संजय वर्मा असे असून तो एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत असल्याचे सांगण्यात आले.