पत्रकार संरक्षण कायदा कुठे अडकला ?

चमकोगिरी करणारे गेले कुठे?

नगर  जिल्ह्यातून काही दिवसापूर्वी एका पत्रकाराचा फोन आला होता. साहेब आमच्या  दैनिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे, आरोपीविरुद्ध कोणती कलमे लावता येतील ?  पोलीस निरीक्षक साहेब पण समोर  आहेत, त्यांच्याशी बोला आणि ते समोरचे पोलीस निरीक्षक माझ्याशी बोलू लागले...
त्यांनी कोणती कलमे लावता येतील हे मला  विचारले असता,  मी ४५२,३२३,४२७,५०४,५०६,१४३ ही  कलमे पटापट सांगितली...
समोरचा पोलीस निरीक्षक म्हणाला, साहेब ही  कलमे तर आम्हाला तोंडपाठ आहेत... अजून कोणते कलमे आहेत,  ते सांगा...
मी म्हणालो, मला इतकेच माहित आहेत ...
आमच्या उस्मानाबादच्या गावकरी कार्यालयावर हल्ला झाल्यावर  पाच आरोपीविरुद्ध हीच कलमे लागली होती आणि कोर्टात  चार्जशीटही दाखल झाल्याचे सांगितलं.
समोरचे साहेब, हसून म्हणाले, तुमचा पत्रकार संरक्षण कायदा कलम सांगा...
मी स्पष्ट सांगितले, अजून राज्यपाल महोदय यांची सही  झालेली नाही... जीआर अजून  निघाला नाही,
लगेच ते साहेब म्हणाले., समोरचे तुमचे पत्रकार बांधव यांना समजावून सांगा . ते पत्रकार संरक्षण कायदा कलम लावा, म्हणून अडून बसलेत...
मग मी त्या पत्रकाराची नंतर समजूत घातली आणि   पत्रकार संरक्षण कायदा कुठे पेंड खात आहे हे सांगितले.
सांगायचा मुद्दा असा की, राज्यात अजून पत्रकार संरक्षण कायदाची अंमलबजावणी झालेली नाही..... उन्हाळी अधिवेशनात मंजूर झालेला हा कायदा पावसाळी अधिवेशन संपले तरी अजून राज्यपाल यांच्या समोर सहीसाठी अडला आहे..
पण सर्व पत्रकारांना वाटते कि, चला आता कायदा झाला, आपणास संरक्षण मिळाले... पण हा मोठा गैरसमज आहे..
दुसरीकडे हा कायदा पास झाल्यापासून रोज हल्ले सुरु आहेत.. अमरावतीचे प्रशांत कांबळे असो की पालघर येथील न्यूज 24 चे पत्रकार संजय सिंह यांच्यावर झालेल्या भ्याड असो... रोज कोणावर ना कोणावर हल्ला सुरु आहे. पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणे सुरूच आहे..
मला हसू याचे येते, पत्रकार संरक्षण कायदा केवळ आणि केवळ माझ्यामुळे मंजूर झाला, हे जे सांगत सुटले होते आणि रोज कुठे ना कुठे सत्कार आणि हारतुरे स्वीकारत फिरत होते, ते गेले कुठे ?
मुळात  यांच्याकडे कुठला पेपर नाही.. यांच्या चौकडीकडे सुद्धा  कुठला पेपर नाही... पत्रकार संघटनेच्या नावाखाली केवळ आणि केवळ दुकानदारी सुरु आहे...
माझे प्रकरण असो की अमरावतीचे प्रशांत कांबळे यांचे प्रकरण असो.. यांच्या पायातील  भिंगरी कुठे गेली होती ? हे अश्यावेळी शेपूट घालून का बसतात ?
यांना  केवळ भाट हवेत आहेत...  यांनी लिहिलेली खोटी पोस्ट फॉरवर्ड करणारे चमचे हवेत..
केवळ झुंडशाही करून यांनी किती लोकांना संपवले आहे ? लोक बदनामी करीता घाबरतात म्हणून यांची मजल दरमजल वाढतच चालली होती..
याना आता हवा आहे जश्यास तसा ठोका ...
दुसरे असे की,
केवळ फेसबुक आणि व्हाट्स अँप वर निषेध करून पत्रकारांना संरक्षण मिळणार आहे का ?
मुळात या कायद्याचा लाभ कोणाला होणार आहे ? ग्रामीण पत्रकार रोज जीव मुठीत धरून काम करतात, त्यांच्यासाठी हा कायदा काहीही कामाचा नाही..
या कायदयाची जरी अंमलबजावणी झाली तरी हा कायदा निव्वळ वांझोटा आहे...
अधिस्वीकृती कार्डहि कोणाला मिळते ? जे खरे पत्रकार आहेत, त्या किती पत्रकाराला हे कार्ड मिळाले आहे ?
पत्रकाराना पेन्शन मिळणार हे केवळ गाजर आहे...
त्यांचे  दुकान मोठे व्हावे, यासाठी आपला उपयोग केला जातोय... संघटनेच्या नावाखाली खिसे भरणे सुरु आहे..
आपण त्यांच्या मागे फिरले की यांना वाटते, आपण नेते झालो...
मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याजवळ यांची दलाली अधिक वाढत आहे... .
तेव्हा जरा सावधच राहा ...


- सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह

 9420477111