पुणे-
पत्रकारितेतून केवळ अापणच अन्यायाला वाचा फोडतो, असा दावा करणार्या
मानबिंदूच्या बुडाखालचा अंधार वाढतच चालला असून, यंदा संस्थेतील
कर्मचार्यांना पगार वाढ सोडाच करारही वाढवून मिळणार नाही. त्यांना
दुसर्याच कंपनीच्या नावाने अाॅर्डर वाटपास सुरूवात झाली आहे. या नव्या
करारानुसार पीएफ कपात होणार नाही. तसेच दर महिन्याला दिली जाणारी पेस्लीप
देखील यापुढे मिळणार नाही. याचाच अर्थ कर्मचारी म्हणून त्यांची नोंद नसेल.
यापूर्वी मानबिंदूने परीक्षा घेऊन मोठी कपात केली होती. त्या पाठोपाठ हा
दुसरा मोठा अन्यायकारक निर्णय घेतला अाहे. त्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले
असून, ज्यांना नव्या कंपनीच्या नावाने करार नको अाहे त्यांनी सरळ घरी
बसावे, असे फर्मानही मालकाने काढले आहे.
केवळ
मालकाची चाटूगिरी करणार्या मोजक्याच कर्मचार्यांना मानबिंदुचे अॅप्रुअल
मिळणार अाहे. यवतमाळच्या भाषेत सांगायचे झाल्यास इतरांच्या हाती फक्त धतूरा
दिला अाहे.
मालकाला भीती मजिठिया वेतन आयोगाची...
ही
सगळी उठाठेव मजिठिया वेतन आयोग लागू न करण्यासाठी असल्याचे सूत्रांकडून
कळते. चार वर्षांपूर्वी मानबिंदूनेच प्रत्येकालाच असिस्टंट हे पद देऊन
पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात यश अाले नसल्याने आता नवा फॉर्म्युला काढण्यात आला आहे.