मनमानसीचा मुका घ्या मुका !

मनमानसी आंध्रतील एका चॅनेलची रायगड प्रतिनिधी.... बिनधास्तपणा अंगात होता.... पत्रकारांचे गुरूजी तिला लेकीच्या मायेने कुरवाळायचे...  तीही गुरूजीच्यासाठी स्वागतास सज्ज असायची कधी रेस्टहाऊस बुकींग तर कधी मच्छी फ्रायकुकींग करून गुरूजीना द्यायची... गुरूजीच्या आज्ञेनुसार कधी रम तर कधी  व्हिस्की?यचीपण!
एकदा शेमच्या कानावर हे आदरातिथ्य गेलं आणि त्याने तिला रायगडच्या मुखपत्राच्या ऑफीसात तातडीनं बोलवलं... तिचं कौतुक केलं... आदरातिथ्याचंही कौतुक केलं... करता करता तो तिला आलींगन देऊन "मुका घ्या मुका" करू लागला.... मनमानसीने मुका तर घेतला नाहीच पण शेमचा मुखभंग मात्र जोरात केला... आता काही वर्ष ऊलटली या घटनेला आणि आरपी क्लबाचा महिला पत्रकार पुरस्कार देऊन मनमानसीचं मन वळवलंय खरं... पाहू या या खेळात पुढे काय काय घडतंय ते.! मालकांनी हे प्रकरण मिटवले नसते तर शेम जेलात जाऊन बसला असता.
.
...

रायगड जिल्ह्यात पन्नाशीच्या आतला आणि तरीही पाचपन्नास वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर बातम्या देण्याचं सातत्य ठेवणारा संपादकीय विभागाची खुर्ची सोडून खेडोपाडी फिरणारा तब्बल 29 वर्षे पत्रकारिता करणारा अवलीया आहे.... शेम जेव्हा रायगडमध्ये स्थिरावण्याआधीच फेकला जाईल असं वाटत होतं त्यावेळी तो कृषीवल या जिल्हा दैनिकाचा चेहरा बदलत असल्याने त्या अवलियाने त्याची साथ द्यायचं ठरवलं.... 
शेमचा सत्कार चक्क पुरोगामी विचारवंत अभिनेते निळूभाऊ फुले याच्याहस्ते दहाएक हजार लोकाच्या ऊपस्थितीत केल्याने शेमच्या मनीमानसीचा मुका घ्या मुका वृत्तीमुळे कृषीवलकारांची लाथ बसायच्याऐवजी विश्वासच बसला आणि शेम रायगडात स्थिरावला...पुढे शेमने आरपी क्लब काढला... चमचे गोळा करून त्याना स्वतःचे विश्वासू केले अन् विश्वासू झाले शेम खुशमस्करे!!!
शेमचा निरोप्या बनलेल्या एका खुशमस्कर्याने अवलिया पत्रकाराला क्लबात येण्याच आवतण दिलं.... पण तेही कसं.... तुम्हाला शेमसायबानी सांगावा धाडलाय पण महाडचे पत्रकार नकोत.... साले महाडचे चोर हैत लईच श्याने हैत... अवलिया भडकला.... तुझा शेम साहेब चोर आहे... सांग भडव्याला महाड माझी जन्मभूमी आहे... आले तर दोन्ही तालुक्यातले येतील पण कुणाला कमी लेखण्याचे काम नाही...
चमच्याला निमित्त भेटलं.... तो तसा बोलला तो असा बोलला... खुपच मीठमसाला लावून सांगितलं शेमला... शेमनं अवलियाला फोन लावला असं का बोललात? 
अवलिया तडकलाच.... निरोप सांगायचा तर सांगितला पण कुणाची निंदा का करायची त्या चमच्याने? अवलिया पत्रकार सतत तडकफडक राहिला आणि त्यामुळे तोच ताठ राहिला... शेम स्वतःला नेता म्हणता म्हणता चमच्यांच्याच हातातलं बाहुलं झालाय... कधी पदं कधी पुरस्कार तर कधी व्यासपीठावर घेऊन अनेकाना आपलंस करणारा शेम अधूनमधून पत्रकार असल्याचं भासविण्यासाठी एका तरूण संपादकाच्या दैनिकात लिहितोय आणि या संधीच्या बदल्यात त्यालाही पुरस्कार मिळवून दिलाच की!!!!!
...
शेमला नडणारा रायगड जिल्ह्यातला जेष्ठ पत्रकार कुठं तरी बदनाम झाला पाहिजे अन् त्याचे विरोधक आपलेसे होऊन आरपी क्लब वाढला पाहिजे... असा डाव खेळला गेला. कोण्या अंध सेटलमेन्ट्यानं महाडला विश्वरूप बघितलं अन् मांडीवर पुढारीपण घेतलं. सेटलमेन्ट्याच्या हाताशी पत्रकाराचा ठेकेदार अन् मांडीवर पुढारीचं गेंगाणं चकणं बाळ अन् झालंच तर गेगाणं लंगडं चम्मचं सोबतीला म्हैसल्याचं ढापणं... या सगळ्याची शेमनं मोट बांधली.... सिंधूदूर्गातून ढूंगणावर लत्ताप्रहार होताच पुनश्च पुढारीच्या पायावर नाक घासणार्या सावन्ताचो शशि कलाकार.... नेतृत्व करायचा आणि सहकारीच दडपायचा ही वृत्ती की विकृती... पण शेम आणि शशि कलाकारात सारखीच भिनलेली... शशि कलाकाराच्या तावडीतही माथेरानच्या हाटेलचा कार्यानुभव असल्याने त्याने जणू तावडीत पुढारी गिरिधारीही खोवला.... आता कटाचा बेत चांगलाच तयार होऊन शिजला...
आता रायगडात कधी पाटील कधी ठाकूर करताना बेघर झालेला शेम छोट्या वेलीवरचा राजन झालाय. अष्टीकर पक्का एकही सहारा झालाय... आता नडणारा पोहोचवायचाच अशा बेताने जमिनमाफियाना हाताशी घेऊन गेंगाणं बाळपण ठेकेदाराला *पटेल* तसा वापरू लागला. ज्येष्ठ पत्रकाराविरूध्द कट फिक्स झाला... कुणाला *पटेल* अथवा न *पटेल* रायगडच्या जेष्ठ पत्रकाराला कोणी खोट्या आरोपाच्या जाळ्यात पकडेल हे तरी .पटेल* काय?
कटाच्या दिवशी ज्येष्ठ पत्रकाराने ज्याच्याकडे खंडणी मागितली तर तोच फिर्यादीच पत्रकाराला दिवसातून दोनवेळा फोन करून *ओ घ्या ना होऽऽऽ* अशा विनवण्या करू लागला.. ज्येष्ठ पत्रकाराने पुन्हा मला फोन करशील तर लाच देण्याचा प्रयत्न करतोस म्हणून गुन्हा दाखल करीन असे सुनावले. हा फोन होताच अमराठी माणसाने पाचच मिनीटात ज्येष्ठ पत्रकाराविरूध्द खंडणी मागितल्याची खोटी तक्रार करून पत्रकाराच्या प्रेशरचा पोलीसावर ऊपयोग करून गुन्हा दाखल केला. 
पण सत्याची बाजू लंगडी पडू द्यायची नाही म्हणून ज्येष्ठ पत्रकाराने वस्तुस्थिती दाखवून मुंबई हायकोर्टातून अटकपूर्व जामिन आणला. पण इकडे सावन्त्या शशि कलाकारानं शेमच्या सांगण्यावरून एका हायस्कूलच्या शिपायाला पुढारीपण देत ज्याने रायगडात पुढारी आणला त्या ज्येष्ठ पत्रकारासमोर ऊभं केलं.... वर्ष दोन वर्षे ते शिपुर्ड माजलं... दारू पिऊन ओकू लागलं... जय गोपाळ जय श्रीकृष्ण स्टेटस व्हाटस अपवर ठेऊन ते शिपुर्ड ज्येष्ठ पत्रकाराला आडवं जाऊ लागलं... शाळेची घंटा वाजवण्याचा निमसरकारी पगार घेणारं ते शिपुर्ड यंदा शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत विद्यार्थी नसतानाही घंटा बडवताना ज्येष्ठ पत्रकाराला दिसला.... आणि मग पत्रकारितेतील ऊपरं ते शिपुर्ड त्याच ज्येष्ठ पत्रकाराने एका लाथेत पत्रकारितेबाहेर घालवलं. हे बघा ते शिपुर्ड शैक्षणिक संस्थेकडून हे पत्र मिळताच ज्येष्ठ पत्रकारानं मारलं असं कोकलंत सुटलंय... पण यावेळी फक्त ढूंगणावर लाथ मारलेय पुन्हा पत्रकारितेत ते शिपुर्ड दिसलं तर त्याच्या पोटावरच बसेल. हे समजून असलेला शेम अन् शशि कलाकाराचा एकोपा ज्येष्ठ पत्रकार आता कुणावर नेम धरणार याचा अंदाज बांधत आहेत.