लोकमतमधील लेखापालाचा 27 लाखाचा अपहार


औरंगाबाद: लोकमतचा लेखापाल प्रशांत मुंदडा ( रा.मित्रनगर ) याने २७ लाखाचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.  मुंदडा विरुद्ध गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून या प्रकरणी लोकमतमधील लेखा विभागातील आणखी काही अधिकारी गुंतले आहेत. याच मुंदडाने औरंगाबादमधील आणखी एकास सहा लेखास चुना लावल्याचे समोर आले आहे.

प्रशांत मुंदडा हा लोकमतमध्ये अनेक वर्षांपासून लेखापाल होता. त्याने २७ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने १६ सप्टेंबरला अटक केली. या प्रकरणात लोकमतच्या लेखाविभागातील आणखी अधिकारी सामील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी मुंदडा अफरातफर करत होता.अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली. नंतर  नागेश्वरवाडीत राहणारे बावस्कर यांनाही मुंदडाने १ वर्षापूर्वी समर्थ मल्टीईंव्हेस्टमेंट या भावाच्या कंपनीत ९ लाख ३६ हजार ५५० लाख रु.गुंतवण्याचा सल्ला दिला.त्यापैकी २ लाख ३२ हजार वापस केले. पण ६ लाख ८१ हजार ही उरलेली रक्कम देण्यास मुंदडा टाळाटाळ करत असल्यामुळे बावीस्करांनी सरळ पोलिसांकडे धाव घेतली. ६ लाखांच्या फसवणूकीचा आणखी एक गुन्हा रविवारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.  .या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलास निरीक्षक अमोल सातोदकर करत आहेत.