आरोपपत्र दाखल करू नका : हायकोर्टाचे आदेश
नागपूर ( विजय खवसे) - अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील पत्रकाराविरूध्द होणाऱ्या पुढील कारवाईला नागपूर खंडपीठाने स्थगिती देवून आरोपीपत्र दाखल करू नये, असे आदेश पोलिसांना दिलेत.
प्रशांत कांबळे असे याचिकाकर्त्या पत्रकाराचे नाव आहे. याचिकाकर्त्याविरूध्द चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान १७ जून रोजी पोलिस ठाण्यात बबनराव थेटे यांची मुलगी ईश्वरी थेटे हिने आत्महत्या केली, याबाबत तक्रार द्यायला गेले होते. ही आत्महत्या चांदूर रेल्वे स्थानकावर झाली होती. आरोपीला अटक झाल्याशिवाय प्रेत उचलणार नाही, अशी भूमीका जमावाने घेतली होती. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. याचिकाकर्ता व इतर पत्रकार घटनास्थळी वृत्तसंकलन करण्यासाठी गेले होते. पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी १८ जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे प्रशांत कांबळे यांना आरोपी दाखविण्यात आले होते. चांदूर रेल्वे येथे नव्याने आलेले ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांच्याकडून तक्रारकर्त्यांना वाईट वागणूक देण्यात आली. अवैध धंदे सुरू होते. याबाबत वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या. याप्रकरणी अनेक पत्रकारांना दंगल प्रकरणात आरोपी करून पोलिस कोठडीदरम्यान मारहाण करण्यात आली, असे अॅड. शेखर ढेंगाळे यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी न्या. वासंती नाईक आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांनी पुढील कारवाईस स्थगिती देवून आरोपपत्र दाखल करू नये, असे आदेश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. शेखर ढेंगाळे यांनी बाजू मांडली.