चॅनेलवल्यानी नाहक बदनामी केल्यामुळे मी आत्महत्या करणार होते !
पण बेरक्याने सत्य बाजू मांडून धीर दिल्यामुळे विचार सोडून दिला !
पुण्याच्या भाग्यश्री होळकर यांचा खळबळजनक खुलासा !!
पुणे
- औरंगाबादच्या बँक कर्मचाऱ्यांच्या खून प्रकरणी आरोपी म्हणून चॅनेलवर
जेंव्हा माझे फोटो पाहिले, तेव्हा माझाच माझ्यावरील विश्वास उडाला, प्रचंड
मानसिक धक्का बसला, आत्महत्या करण्याचे डोक्यात विचार सुरू झाले, त्याच
अवस्थेत मी हडपसर पोलीस स्टेशन गाठले, तिथे बेरक्या रिपोर्टरची भेट झाली,
त्यांनी धीर देवून बेरक्याने तुमची बाजू लावून धरल्याने सांगितले आणि
न्यूज दाखवली ! काळजी करू नका, आम्ही तुमची सर्व बाजू मांडू असा धीर दिला,
त्यानंतर मी आत्महत्याचा विचार सोडून लढायला शिकले,असा खळबळजनक खुलासा
पुण्याच्या भाग्यश्री होळकर यांनी केला आहे...
आजपर्यंत
मी बेरक्या ब्लॉग वाचला नव्हता किंवा बेरक्या कोण आहे हे मला माहित नाही
पण बेरक्याने माझा जीव वाचवला आहे, नंतर मी बेरक्या ब्लॉगवर सर्व न्यूज
पहिल्या, माझी बाईट पहिली , ज्यांनी माझी बदनामी केली त्यांना चांगले
झोडपून काढले आहे, बेरक्या माझ्यासाठी देवदूत आहे, असेही भाग्यश्री होळकर
म्हणाल्या !
कोणतीही
खातरजमा न करता, केवळ नावात साधर्म्य लावून फोटो शोधणे, आरोपी म्हणून जगभर
प्रसिद्ध करणे हे त्या पत्रकाराचे अत्यंत नीच कृत्य आहे, मी एबीपी माझा,
IBN लोकमत चॅनेलवर गुन्हा दाखल केलाय , त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर
कारवाई करणार आहे .. ती कारवाई काय असेल हे आता सांगणार नाही, पण करून
दाखवेन, असेही भाग्यश्री होळकर म्हणाल्या !
.....
मित्रानो,
पुण्याच्या भाग्यश्री होळकर यांची चॅनेलवाल्यानी नाहक बदनामी केली, या
जागी आपले कोणी असते तर काय केले असते, याचा कोणी गांभीर्याने विचार केला
आहे का ?
बेरक्या रिपोर्टरने सदर महिलेची भेट घेवून
तिची बाजू भक्कमपणे मांडली, बाईट घेवून तो बेरक्या ब्लॉगवर प्रसारित केला
म्हणून भाग्यश्री शांत झाल्या ! यदाकदाचित त्यांनी जीवाचे बरेवाईट करून
घेतले असते तर आज बदनामी करणारे जेलमध्ये गेले असते !
लक्षात ठेवा ! बेरक्या सत्य छापतो ! इतकेच काय एखाद्याचा जीव वाचवतो !
याचा धडा घेवून आता तरी बोध घ्या ! पूर्ण खात्री झाल्याशिवाय फोटो प्रसारित किंवा प्रसिद्ध करू नका !!
- बेरक्या उर्फ नारद