स्टार अँकर मिलिंद भागवत यांचाही अखेर राजीनामा

मुंबई - विलास बडे पाठोपाठ स्टार अँकर मिलिंद भागवत यांनीही एबीपी माझाचा राजीनामा दिला आहे.याबाबतचे वृत्त बेरक्याने नुकतेच दिले होते. यामुळे एबीपी माझाला मोठा हादरा बसला आहे. बडे, भागवत दोघेही लवकरच IBN लोकमत जॉईन करणार आहेत.
एबीपी माझा १० वर्षांपूर्वी सुरु झाले, तेव्हापासून मिलिंद भागवत कार्यरत होते. रात्री १० च्या बातम्या म्हणजे मिलिंद भागवत असे सूत्र तयार झाले होते. एक शांत आणि संयमी अँकर असलेल्या  मिलिंद भागवत यांना चॅनलमधील लॉबिंगचा गेल्या काही महिन्यात मोठा  त्रास झाला होता, जेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तेव्हा दिल्लीचे मिलींद खांडेकर आणि मालकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करावा लागला.
एबीपी माझाचा खरा चेहरा मिलिंद भागवत गेल्यामुळं  माझाला मोठा हादरा बसला आहे. आता सारी मदार ज्ञानदा कदम , नम्रता वागळे आणि अश्विन बापट,यांच्यावर आहे. बाकी सर्व नवीन चेहरे आहेत.
तरुण भारत - नवशक्ती- नवभारत टाइम्स - सी न्यूज- ई टीव्ही मराठी- झी मराठी- झी 24 तास- असा प्रदीर्घ प्रवास करत गेली 10 वर्षे एबीपी माझा च्या यशासाठी झटणारा लोकप्रिय अँकर मिलिंद  भागवत यांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा