गणेश म्हणजे एक उत्साही आणि हरहुन्नरी कलाकार. उत्तम निवेदक, गायक आणि वादनाचे ज्ञान असणारा गणेश पत्रकारितेच्या घबडग्यातही आपल्यात दडलेल्या कलाकाराला जपायचा. विशेष म्हणजे त्यानं लोककला, नाटक, लोकसंस्कृती, आंबेडकरी चळवळ यासारख्या आपल्या आवडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करून आपल्या कामात आनंद शोधला होता. या सर्व क्षेत्रात गणेशचा मुक्तसंचार असे. अफाट लोकसंग्रह हे त्याचं खास वैशिष्ट्य.
दर आठवड्यात तो क्राईम शो सादर करत असे. त्यामध्ये त्याचं हे सारं कसब, कौशल्य दिसत असे... त्याच्या शोमध्ये तो ज्याप्रमाणात माणसं आणायचा, ते अनेकदा मन थक्क करणारं असे. काम करताना, कामात स्वतःला झोकून देताना गणेशचा चेहरा सतत हसरा असे... गणेश आपल्या सोबत ते निखळ हास्य घेऊन गेला आहे. त्याच्या निधनाने मराठी पत्रकारितेची फार मोठी हानी झाली आहे. पण त्यापेक्षा जास्त, कशानेही न भरून निघणारे नुकसान त्याच्या लहानशा कुटुंबाचं झाले आहे.
गणेश बच्छावबद्दल IBN लोकमतचे माजी संपादक मंदार फणसे आणि कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी एक पोस्ट शेयर केली आहे.
एक अत्यंत वाईट बातमी
आमचा गणेश गेला...
गणेश
म्हणजे एक उत्साही आणि हरहुन्नरी कलाकार. उत्तम निवेदक, गायक आणि
वादनाचे ज्ञान असणारा गणेश पत्रकारितेच्या घबडग्यातही आपल्यात दडलेल्या
कलाकाराला जपायचा. विशेष म्हणजे त्यानं लोककला, नाटक, लोकसंस्कृती,
आंबेडकरी चळवळ यासारख्या आपल्या आवडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करून
आपल्या कामात आनंद शोधला होता. या सर्व क्षेत्रात गणेशचा मुक्तसंचार असे.
अफाट लोकसंग्रह हे त्याचं खास वैशिष्ट्य. यंदा प्रसिद्ध गायिका अनुराधा
पौडवाल यांना पद्य पुरस्कार मिळाला. तो जाहीर होताच गणेश धावत माझ्याकडे
आला, म्हणाला, "आपण अनुराधा ताईंना न्यूजरूम चर्चा साठी बोलवू या का ?"
मी
विचारले, "त्या येतील का ?" त्या वेळी मोठया खात्रीने गणेश ऊत्तरला
होता, "का नाही ?" आणि त्याच दिवशी अनुराधा ताईं आल्या, गणेशच त्यांना
आणायला गेला होता... अनुराधा ताईंची मुलाखत छान रंगली. त्याच्यानंतर
थोड्याच वेळाने गणेश परत आला, कानाशी असणारा मोबाईल माझ्या हातात देऊन
म्हणाला, कैलास खेर फोनवर आहेत, त्यांना मी मुलाखतीसाठी बोललोय,
तुम्हीपण बोला... पलीकडून प्रसिद्ध गायक कैलासजी मोठ्या अदबीने बोलत होते,
गणेशजीने बुलाया है, तो हम ना नही कह सकते... गणेशचा लोक संग्रह आणि
लोक संपकॅ हा असा आश्चर्यचकित करणारा होता... दर आठवड्यात तो जो क्राईम शो
सादर करत असे त्यामध्ये त्याचं हे सारं कसब, कौशल्य दिसत असे...
त्याच्या शोमध्ये तो ज्याप्रमाणात माणसं आणायचा, ते अनेकदा मन थक्क
करणारं असे.
काम करताना, कामात स्वतःला झोकून
देताना गणेशचा चेहरा सतत हसरा असे... गणेश आपल्या सोबत ते निखळ हास्य
घेऊन गेला आहे... त्यांच्या या दु:खात आम्ही सारे
सहभागी आहोत.