मुंबई - "चला जग जिंकू" या अशी टॅगलाईन घेवून आलेल्या IBN लोकमत मधून निखिल वागळे सह एक मोठी टीम बाहेर पडल्यानंतर "महाराष्ट्राचं महाचॅनल" अशी नवी टॅगलाईन करण्यात आली होती; आता चॅनलचे नावच बदलण्यात येत आहे. "न्यूज १८ लोकमत" असे चॅनलचे नाव राहील,
नेटवर्क १८ चे अधिकार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे गेल्यानंतर हिंदी न्यूज चॅनल IBN 7 चे नाव NEWS 18 इंडिया करण्यात आले होते. मराठी चॅनल IBN लोकमतचे
नाव मागेच बदलण्यात येणार होते. मात्र वागळे गेल्यामुळे अगोदरच TRP
घसरल्यामुळे अजून TRP घसरेल म्हणून हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला
होता. आता त्याचा मुहूर्त सापडला आहे."न्यूज १८ लोकमत" हे नवे नामकरण येत्या महिनाभरात होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे. News Update
IBN लोकमत मध्ये गळती सुरूच...
मंगेश चिवटे यांचा राजीनामा ... जय महाराष्ट्र जॉईन करणार .....
जाता जाता
मुंबई - टीव्ही ९ मधून बाहेर पडलेले निलेश खरे अखेर साम चॅनल मध्ये संपादक म्हणून जॉईन झाले आहेत.
ABP माझा, मी मराठी, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ असा प्रवास करीत खरे साम मध्ये जॉईन झाले आहेत.
बेरक्याचे वृत्त नेहमीप्रमाणे "खरे" ठरले आहे.