मुंबई - IBN लोकमत चॅनेलचं नामांतर आता News
18 लोकमत झालं आहे. बेरक्याने हे वृत्त तीन महिन्यापूर्वी दिलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून याचं रीतसर
प्रसारण करण्यात आलं. सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी, आपण समाधानी असल्याचे सांगत, जाहिरातीमध्ये झळकलेले लाभार्थी अस्सल आणि खरे असल्याचं सांगितलं. यावर विरोधक कसे राजकारण करतात हे सांगत असतानाच ,लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांना एका प्रश्नाच्या उत्तरात चांगलेच फटकारले.
आठ वर्षांपूर्वी चला जग जिंकू या अशी टॅगलाईन घेवून आलेलं IBN लोकमत जग बदलतंत, तसं
आम्हीही बदलतोय असं सांगत News 18 लोकमत असं नाव धारण केलं आहे. नवा रंग नवा जोश म्हणत ध्यास जनमानसाचा असं सांगत आहे.एबीपी माझातून आलेले मिलिंद भागवत आणि विलास बडे आजपासून नव्या जोशात फिल्डिंग लढवत आहेत.
पाच शिलेदार
सायंकाळी ७ ते ११ या प्राईम टाईम मध्ये पाच महत्वाचे शिलेदार खिंड लढवणार आहेत. यापूर्वीचे वृत्त वाचा
जुन्या बाटलीत नवी दारू !