मुंबई -
बेरक्याचे भाकीत नेहमीप्रमाणे खरे ठरले आहे. डॉ. उदय निरगुडकर अखेर
News 18 लोकमतमध्ये मुख्य संपादक तथा ग्रुप एडिटर म्हणून आज जॉइन झाले आहेत. ते
आल्यामुळे हे चॅनल नंबर 1च्या स्पर्धेत येणार का ? हे आता काळच ठरवेल.
झी 24 तासला नेहमी नंबर 1आणणाऱ्या डॉ. उदय निरगुडकर यांना 31 ऑक्टोबर रोजी
तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते News 18 लोकमतमध्ये
जाणार, असे भाकीत बेरक्याने वर्तविले होते. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी
डॉ उदय निरगुडकर News 18 लोकमत'च्या वाटेवर हे वृत्त दिले होते.हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
पत्रकारितेचा
कसलाही अनुभव नसताना, डॉ. उदय निरगुडकर झी 24 तास मध्ये संपादक म्हणून जॉईन
झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या,पण त्याच निरगुडकर यांनी झी 24 तासला नंबर 1 मध्ये आणताच अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. आता नंबर
चारवर गेलेले News 18 लोकमत नंबर 1 वर आणण्यासाठी निरगुडकर यांच्यासमोर
मोठे आव्हान असेल.
डॉ. निरगुडकर मुख्य संपादक तथा ग्रुप
एडिटर म्हणून जॉईन झाले आहेत. ते चॅनलचे संपादक प्रसाद काथे आणि वेबचे
कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांचे हेड असतील.