जनशक्तिच्या कुंदन ढाकेंना वार्ताहराने बजावली कायदेशीर नोटीस ...

मुंबई - वार्ताहरांना मानधन न देता  फुकटात राबववून हात वर केल्याप्रकरणी दैनिक जनशक्तिचे मुख्य संपादक आणि मालक कुंदन ढाके यांना भिवंडीतील वार्ताहर पांडुरंग सपकाळ ( वय ६८ ) यांनी वकिलामार्फत  कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
दैनिक जनशक्तिच्या  वार्ताहरांनी प्रामाणिक काम करूनही त्यांना मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे वयोवृध्द वार्ताहर पांडुरंग सपकाळ ( वय ६८ )  यांनी कायदेशीर बडगा उचलला आहे.

मूळ जळगावचा असलेला जनशक्ति पेपर मोठा गाजावाजा करून पुणे आणि मुंबईत सुरु करण्यात आला पण काही दिवसातच फुगा फुटला आहे. हे दैनिक आर्थिक घाट्यात सुरु असल्याने गेल्या अनेक महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारी झालेल्या नाहीत. संपादकीय , वितरण, जाहिरात, मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2018 पर्यंत राबवून थकीत पूर्ण 8 महिन्यांचे वेतन अदा केलेच नाही ! त्यामुळे सर्व कर्मचारी अस्वस्थ आहेत. काही कर्मचारी कंटाळून नोकरी सोडले असता, त्यांचे थकीत वेतन दिले गेले नाही. इतकेच काय तर त्यांची PF रक्कम हडप करण्यात आली आहे. . कामगारांच्या वेतनातून कपात करूनही PF रक्कम खात्यात न भरता परस्पर हडप केल्याप्रकरणी काही कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तांकडे सामूहीक तक्रार दाखल केली आहे. .

पगार वेळेवर न करणे, PF  रक्कम हडप करणे आदी कारणामुळे सहसंपादक नितीन सावंत, मुख्य उपसंपादक प्रवीण शिंदे, डीटीपी इन्चार्ज अविनाश कदम, डिझाईनर सचिन मोहिते यांनी एक महिन्यापूर्वी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पैकी शिंदे मुंबई 'सकाळ'ला, तर कदम दबंग दुनियाला जॉईन झाले आहेत.

जाता -जाता  : या पेपरचा पुणे ,पिंपरी चिंचवड, मुंबई मध्ये जेमतेम खप आहे.. हा पेपर प्रचंड घाट्यात सुरु असतानाही केवळ इतर धंदे जोपासण्यासाठी सुरु ठेवण्यात आला आहे.