जळगाव
- सन २००१ मध्ये देशदूतला संपादक असताना, धों. ज. गुरव यांना एका पोलीस उपनिरीक्षकाकडून 15
हजार रुपयांची लाच घेताना एससीबीने रंगेहाथ पकडले होते, अनेक वर्ष खटला चालल्यानंतर त्यांची १ फेब्रुवारी २०१८ रोजी निर्दोष मुक्तता झाली आहे, पण या लाचखोरी प्रकरणाची माहिती दडवून निवृत्तीनंतरही "पुढारी"त चिकटलेले गुरव
यांची अखेर "पुढारी"तून हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र
दौऱ्यावर असलेले समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांनी गुरव यांच्या हाती
नारळ सोपविला. प्रशासनापासून अत्यंत महत्त्वाची माहिती दडवून ठेवल्याचा
ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. त्यांची शिफारस करणाऱ्या दिवाळखोरीतील
जाहिरात संस्थेवरही "पुढारी"कार कमालीचे नाराज आहेत.
गुरव हे गेले काही
दिवस याच जाहिरात एजन्सीच्या दावणीला बांधले गेले होते. ते त्या एजन्सीच्या
कार्यालयातच जाऊन बसत. गेले काही दिवस गुरव यांना स्वर्ग दोन बोटे उरला
होता. स्वतःबाबत फुशारक्या मारतांना ते विनाकारण काही चांगल्या लोकांची
नावे घेऊन, हे जाऊन आले; पण झाले नाही वैगेरे चर्चा पसरवत होते. त्यांचा एक
पंटर सरळ इतर स्थानिक दैनिकांच्या वेबसाईट्सवरून बातम्या कॉपी करून
जशाच्या तशा पाठवतो, हे सर्वश्रुत होतेच; तीही चोरी पकडली गेली आहे. गुरव
यांना काही दिवसांपूर्वीच सुरेश पवार यांनी जोरदार झापून काढले होते. खडसे
यांच्या समर्थनार्थ सुपारी घेतल्यागत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची बदनामी केली होती. गेले काही दिवस सातत्याने गुरव व त्यांचा पंटर ही
'पेड' लाईन चालवून "पुढारी"ला उल्लू बनवत होते. हा पंटर एकाचवेळी इतरही 2
ठिकाणी नोकऱ्या करतो, ही दोन्ही ठिकाणे खडसे यांच्या पंटर्सचीच असल्याने
"पुढारी"च्या व्यासपीठाचा गैरवापर केला जात होता. दुर्दैवाने, गुरव यांना
पूर्वी लाचखोरीच्या जाळ्यात अडकवणारा व नंतर बेरोजगारीत आसरा देऊन उपकार
करणारा सूत्रधार हा खडसेविरोधी म्हणजे सुरेश जैन गटाचा... त्याला
"पुढारी"तील ही खडसे लाईन काही रुचत नव्हती. शेवटी त्यानेच कोल्हापुरात पिन
मारून पूर्वी दडविलेले गुरव यांचे "ट्रॅप सीक्रेट" उघड करून त्यांची
बदनामी केली, गेम केला!! साठीत भान हरपून आत्मप्रौढीत रमलेल्या गुरवांनाही
हा दणका हवाच होता!!.