औरंगाबाद
: श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती, दिल्ली आणि
लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवबा, महात्मा जोतिबा जयंती
महोत्सव साजरा केला जाणार असून, या महोत्सवानिमित्ताने विविध क्षेत्रातील
मान्यवरांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार
आहे़ पुण्यनगरीचे उपसंपादक मनोज सांगळे यांना क्रांतीबा जोतिबा फुले
पत्रगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे़
सिडको बसस्थानकाजवळील हॉटेल विंडसर कॅसलमध्ये मंगळवारी (दि़ १३) सायंकाळी सहाला होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन माजीमंत्री गंगाधर गाडे यांच्या हस्ते होणार आहे़ अध्यक्षस्थानी माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील असतील़ श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष इंजि़ मिलिंद पाटील, विचारवंत श्रीमंत कोकाटे, प्रा़ डॉ़ प्रतिभा अहिरे यांची प्रमुख उपस्थिती असेल़ या वेळी प्रसारमाध्यम विभागातून 'पुण्यनगरी'चे उपसंपादक मनोज सांगळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, लोकमतचे विजय सरवदे, एबीपी माझाचे कृष्णा केंडे यांना क्रांतीबा जोतिबा फुले पत्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल, अशी माहिती संयोजक इंजि़ मिलिंद पाटील यांनी दिली़ बुलडाण्यातून पत्रकारिता सुरू करणारे सांगळे गेल्या १४ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत़ आतापर्यंत त्यांनी सकाळ, लोकमत, दिव्य मराठीमध्ये विविध पदांवर जबाबदारीने काम केले आहे़ टीकात्मक पत्रकारितेपेक्षा विधायक पत्रकारितेवर त्यांचा भर राहिलेला आहे़