खींचो न कमानों को
न तलवार निकालो !
जब तोप मुक़ाबिल हो
तो अख़बार निकालो!!
पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्ट्राचार याविरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा, समोरचा बरोबर घायाळ होईल ...
जे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात, त्यांनी पत्रकारिता न करता वडापावचा गाडा टाकावा,असे माझे स्पष्ट मत आहे.
....
पत्रकारिता जीवनाची सेवा आहे.ढोंग, विषमता आणि अन्याय ह्यांच्याविरुद्ध उपसलेली ती तलवार आहे. सत्य, समता, आणि स्वातंत्र्य यांच्या आराधनेची ती पूजा आहे.
पत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार आहे. पत्रकाराच्या लेखणीला तलवारीची धार नसेल, तर सत्य सांगण्याचा आणि न्याय देण्याचा धंदा त्याला यशस्वीपणे करता येणार नाही. त्याने 'पत्रकार' होण्याऐवजी 'पात्रकार' व्हावे! असं आचार्य अत्रे यांनी म्हटलंय .पण आजकाल अर्ध्या हळकुंडात न्हालेल्या 'पत्रक'कारांनी पत्रकारितेचा धंदा मांडलाय.पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी सुरू आहे.

जो पत्रकार सत्य वागतो, सत्य लिहितो त्याविरुद्ध षडयंत्र केलं जातं.
दुकानदारी करणारे एकत्र येतात आणि सत्यवादी पत्रकारविरुद्ध मोहीम राबवली
जाते, दोन नंबर धंदेवाल्यास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जातात.अश्या
लोकांचे जागोजागी पिक वाढले आहे.त्यात बिनकामाचे तण वाढले आहे, ज्यास चार
ओळीची बातमी नीट लिहिता येत नाही, ते पत्रकार म्हणून मिरवत आहेत.
समाजाने अश्या लोकांना खड्याप्रमाणे बाजूला ठेवले पाहिजे. जे सत्य लिहितात, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ....
सुनील ढेपे

माध्यम कोणतेही असो, कंटेंट महत्वाचा आहे...
मोठा पेपर, मोठे चॅनल हातात असले म्हणजे तो रिपोर्टर मोठा होत नाही !
आपण त्यात किती मोठे आहोत, हे महत्वाचे आहे !!
किती बातम्यांना न्याय दिला, कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला, यावरच त्या पत्रकाराचे मूल्यमापन ठरते !
केवळ जॉब करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, त्याला हाडाचा पत्रकार व्हावे लागते !
जनावरांचे हाड खावून कोणी हाडाचा पत्रकार होत नसतो !
वाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नसतो, तसे गळ्यात प्रेस कार्ड अडकावून कोणी पत्रकार होत नसतो !
गाडीवर तर कोणीही प्रेस लिहितो, पण हृदयात प्रेस आहे का, याचे आत्मपरीक्षण करा !
#पत्रकारिता प्रशिक्षण
सुनील ढेपे
संपादक, महाराष्ट्र आणि उस्मानाबाद लाइव्ह