मनोज भोयर, विनोद राऊत जय महाराष्ट्र मध्ये ...

मुंबई - जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आशिष जाधव पॉलिटिकल एडिटर म्हणून जॉईन झाल्यानंतर आता  मनोज भोयर सहाय्यक संपादक तर विनोद राऊत इनपुट हेड म्हणून जॉईन झाले आहेत.

भोयर यांनी यापूर्वी न्यूज वर्ड इंडिया मध्ये महाराष्ट्र ब्युरो म्हणून काम केले आहे. त्यापूर्वी त्यांनी ई -टीव्ही , सहारा टीव्ही,  मध्ये काम केले आहे. विनोद राऊत यांनी यापूर्वी आयबीएन लोकमत, साम मध्ये काम केले आहे.मंदार फणसे जिकडे तिकडे विनोद राऊत असे गणित होते.

विनोद राऊत यांना इनपुट हेड केल्यामुळे तुषार शेटे यांना आता काय काम देण्यात येणार याकडे लक्ष वेधले आहे.