मोदी हत्येच्या कटाबाबत पेरलेली उठवळ बातमी, राज्यासह
देशभरातील उथळ वृत्तपत्रे आणि पुण्यातील वर्तमानपत्रांची संयमी, वस्तुनिष्ठ
पत्रकारिता !
● केवळ
राज्यातीलच नव्हे तर देशभरातील वृत्तपत्रांनी आज मोदी हत्येबाबत अत्यंत उथळ
व थिल्लर पद्धतीने बातम्या दिल्या आहेत. तुलनेने पुण्यातील पुढारी, लोकमत व
सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांनी मात्र त्याबाबत संयमपूर्ण व
वस्तुस्थितीदर्शक बातम्या दिल्या आहेत. अपवाद मटा, ज्यांनी राज्यासह
देशभरातील इतर वृत्तपत्राप्रमाणे पुण्यात असूनही इथल्या वास्तुस्थितीचे
इनपुट्स समाविष्ट न करता म् मं म्हणत संत्रा बर्फी स्क्रीप्ट जशीच्या तशी
सर्वात टॉपला, फ्रंट पेजवर छापली आहे.
●
या पकाऊ स्टोरीचे 2 भाग आणि 2 स्क्रीप्ट रायटर आहेत. पहिला भाग दिल्लीतील,
स्क्रीप्ट सांबित पात्रा, दुसरा भाग मुंबईतील नागपुरी संत्रा बर्फी
स्क्रीप्ट. पात्रा हे पात्र मनोरंजक आहे. तपासी यंत्रणा असलेल्या पुणे
पोलिसांनी कोर्टात पुरावे सादर करण्याअगोदर या पात्राने दिल्लीत आदल्या
दिवशी सायंकाळी एक पकाऊ ई-मेल पत्र व्हायरल केले. ते सत्य असेलच तर सर्वात
आधी न्यायप्रविष्ठ बाबीतील पुरावे लीक करणाऱ्या, तपासी यंत्रणांचा भाग
नसलेल्या पात्राच्या मुसक्या आवळायला हव्यात. असो, तर ही मनोरंजक डेव्हिड
धवन स्टाईल स्क्रीप्ट पात्रा प्रस्तुत आहे. दुसऱ्या स्क्रीप्टरायटरने
दिल्लीतील पात्राची स्टोरी कॉपी करून अजून 'काला'स्टाईल दाक्षिणात्य
माल-मसाला घालून रंगवून सांगितली. (जी आज पुण्यातील एकट्या 'मटा'प्रमाणे,
पुण्याबाहेर राज्यात, देशात म् मं म्हणत सर्वांनी छापली!) दुर्दैवाने, हे
दुसरे स्क्रीप्ट रायटर जबाबदार पदावर आहेत. त्यांनी इतकी घाई का केली? DG
ला का नाही प्रेस घ्यायला सांगितली? पुणे SP, कमिशनरला का नाही सांगितले?
तपासी यंत्रणांचे मत विचारात का घेतले नाही ...? असे अनेक प्रश्न आहेत ...
पण, म्हण आहेच की - निष्ठाप्रदर्शनाच्या पाण्याला खळखळाट फार ...
निष्ठेऐवजी भक्तीही चालू शकेल; पण ती सहेतुक आहे!!
*आता पाहू वस्तुस्थिती अन मटा वगळता पुण्यातील पुढारी, लोकमत व सकाळ या इतर 3 प्रमुख वृत्तपत्रांनी दाखविलेली समज ...
●
या सर्वांनी नागपुरी स्क्रीप्ट ला पुण्यातील प्रत्यक्ष तपासी यंत्रणांच्या
वास्तुस्थितीची जोड दिलीय. त्यामुळे वाचकाला दूध का दूध, पानी का पानी
कळते. 'लोकमत'ने ही बातमी मुख्य अंकात घेतलेलीच नाही. 'हॅलो' या पुरवणीत 8
व्या पानावर स्टोरी घेतलीय. त्यांनी नागपुरी स्क्रीप्ट देताना शीर्षकात
अधिकृत यंत्रणांकडून पुष्टी नाही हे ठळकपणे नमूद केलेय. *जिल्हा सरकारी
वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयीन ऑन रेकॉर्ड युक्तिवादात फक्त राजीव
गांधी यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे स्पष्ट केले, ही ठळक चौकट 'लोकमत'ने
या बातमीत प्रसिद्ध केलीय. या प्रकरणाशी थेट संबंधित, ज्यांनी ही अटक
कारवाई केली, ते *तपासी अधिकारी सह आयुक्त राजेंद्र कदम यांनी या विषयाबाबत
माध्यम प्रतिनिधींशी बोलणे टाळले, यातच सारे काही आले. दिल्ली-मुंबईतील
स्क्रीप्ट रायटर्सनी प्रत्यक्ष सहभागी, संबंधित सरकारी यंत्रणांची फार मोठी
अडचण करून ठेवलीय. अल्फ्रेड हिचकॉक स्टोरी ठसविण्याच्या नादात दोन्ही
स्क्रीप्ट रायटर्सनी तिची पार धवन स्टाईल लोटपोट कॉमेडी करून ठेवलीय यातील
अजून एक अत्यंत लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, पोलिसांना
सापडलेल्या आतापर्यंतच्या पुराव्याआधारे न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या
सरकारी वकिलांनी कुठेही मोदी हे नाव घेतलेले नाही! 'पुढारी'ने मूळ
बातमीला पुण्यातील तपासाची वस्तुस्थिती जोडून घेतली आहे.
'सकाळ'ने
मुंबई स्क्रीप्टची छोटीशी बातमी पान 3 वर प्रसिद्ध केलीय; पण त्या शेजारीच
टॉपला व्हायरल पत्राबद्दल पुणे पोलिसांचे मौन; अधिकृत दुजोरा नाही,
पत्राच्या सत्यतेबद्दल प्रश्नचिन्ह!* अशी ठळक चौकट दिली आहे. या
पत्राप्रमाणेच दोन्ही स्क्रीप्टरायटर पात्रांच्या भूमिका व हेतूबाबतही
प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात पुण्यातील 'मटा'वगळता इतर 3 प्रमुख दैनिके
यशस्वी झाली आहेत. *'लोकसत्ता'ने कालच 'मोदी यांची घटती लोकप्रियता
जपण्यासाठी हा नसता उद्योग सुरू असल्याची बातमी ऑनलाईन दिली होती.
●
एकूणच 2019 निवडणुकांपूर्वी गुजरातेत यापूर्वी रचले गेले तसे विनोदी
प्लॉट्स रचले जातील, अशा अनेक मनोरंजक, विनोदी स्क्रिप्टस लिहिल्या जातील.
*व्यथित करणारा प्रश्न एकच आहे, एरव्ही खातरजमा करणारी, पुरावे मागणारी
माध्यमे म् मं म्हणत ही असली भंपक स्क्रिप्टस जशीच्या तशी छापतात, तेव्हा
त्याचा "अर्थ" काय..? आधीच प्रिंट संकटात असतांना हे असल्या उरफाट्या,
हास्यास्पद उद्योगांनी माध्यमांची विश्वार्साहता व पत काय राहील..?*
टीव्हीचं ठीक आहे, त्यांच्याकडे अजूनही कुणी गांभीर्याने पाहत नाही; पण
छापील शब्दांना अजूनही प्रमाण मानले जाते, त्याला किंमत आहे ... ती कृपया
घालवू नका ... पुण्याच्या वृत्तपत्रांचा आदर्श घ्या... *पुण्यातील लोकमत,
सकाळ, 'पुढारी'चे अभिनंदन!! आज तुम्ही वाहवत गेला नाहीत, पत्रकारिता
धर्माला जागलात!!*