मुंबई - काही
लोकांना यश पचत नाही.
चांगल्या समाजासाठीच्या लोकांचेही असेच आहे. चॅनेल सुरू होऊन १०
वर्षे झाली. पण नंबर वन वर पोचता आणि पोचले तर टिकता येत नाही. गेल्या
आठवड्यात चॅनेल नंबर वन वर आला आणि स्टाफने लंडन टॅक्सी हॉटेलमध्ये पार्टी
केली. बहुतेक पार्टीची धुंदी उतरायला वेळ लागला. धुंदी उतरेपर्यंत चॅनेल
पुढच्या आठवड्यात १ नंबर पोजिशनवरून घसरलेला होता.
चांगल्या समाजासाठी कडे सर्व काही आहे. चांगले
इन्फ्रास्ट्रक्चर, चांगला पगार, चांगले नेटवर्क. एकच गोष्ट चांगली नाही.
तिथला स्टाफ. खास करून आउटपुटचा. मीडियातले काहीही न कळणारा बेदम तिथे
नागोबासारखा बसला आहे. आला नविन बॉस, लाव त्याला मस्का. प्रत्येक नविन
बॉसच्या कानाला लागून त्याच्या मर्जीत राहण्याचे धंदे बेदम करतो. आउटपुटचा
सर्व स्टाफ त्याला त्रस्त आहे. बरे हा काही आउटपुटचा हेडपण नाही. त्याची
पोजिशन आउटपुट हेड अशी नाहीच. तो स्वघोषित आउटपुट हेड आहे. चिलेश बरे तिथे
लागल्यानंतर तो बेदमला काढणार होता. एरवी चिलेश आणि कमकुवत यांच्यात
विस्तव पण जात नाही. पण बेदम हा खायला काळ आहे, यावर मात्र चिलेश आणि
कमकुवत दोघांचेही एकमत होते. कमकुवत
चांगल्या समाजासाठीचा मेन होता तेव्हा बेदमला
कायम नाइट शिफ्टला ठेवा, असे म्हणायचा. बेदमच्या नशिबाने दोघेही तिथून
गेले.
त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार विनोद
यांनी मोठे निर्णय घेतले. मीडियातला अमिताभ बच्चन अशी ओळख असलेल्या गुणी पण
प्रचंड तापट जरबला चॅनेलमध्ये आणले आणि त्याला मोठी पोजिशनल दिली. खूप
वर्षापूर्वी अजित साही यांना दिलेली पोजिशन त्यांनी बच्चनला दिली.
टीव्हीच्या पहिल्या फळीचा जुना पत्रकार असलेला जरब उर्फ बच्चन आल्यानंतर
चॅनेलमध्ये सुधारणा दिसायला लागली. पण बच्चनने बेदम आणि नंतर आलेल्या टकलू
हैवानचे काळे कारनामे कापडींपर्यंत न पोचवणे त्याला महागात पडले.
वेळप्रसंगी चॅनेलच्या भल्यासाठी रेड्डी यांनाही नडणाऱ्या बच्चनला त्याचा
अतिप्रामाणिकपणा आणि तत्वनिष्ठा नडली. अंतर्गत
राजकारणाची किळस बाळगणाऱ्या बच्चनने तडकाफडकी संपादकपदाचा राजीनामा टाकला.
त्याच्याबरोबर येऊ पाहणाऱ्या अनेकांना त्यांनी चॅनेलमध्ये थांबवून ठेवले.
तरीही इनपुट आणि आउटपुटमधली चांगली माणसे आता
चांगल्या समाजासाठी
ला बायबाय करीत आहेत.
दोन
ओळी धड लिहिता न येणारा, दोन चमचे आणि सिरीयसली काम करणारे दोनतीन
असाइनमेंटवाले यांच्या जीवावर उड्या मारणारा, इनपुट टीममध्ये स्वतःला मोठा
समजणारा सोहन लाळखोटे हा बेदम आणि टकलू हैवानच्या ग्रुपमध्ये गेला आणि
कारस्थाने सुरू केली. दिवसरात्र मरमर मरणाऱ्या रिपोर्टरना तो वाटेल तसं
बोलतो. इनपुटला वाली नसल्यामुळे आणि रिपोर्टर लोकांच्या नाराजीमुळे शेवटी
कर्मा यांना इनपुटची तात्पुरती जबाबदारी (हेडची पोस्ट नाही)
सोहन लाळघोटे सांभाळत आहे, असा मेसेज टाकावा लागला. त्यातल्या तात्पुरत्या
शब्दामुळे रिपोर्टर समाधानी झाले आहेत. बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या
लोकांना आणि विविध कार्यक्रमाच्या आयोजकांना बातम्यांसाठी सोहन लाळघोटेला
संपर्क करा, असे सांगणेही रिपोर्टरच्या जिवावर येते. सोहन लाळघोटे हा
असाइनमेंटमध्ये कमी आणि आउटपुटमध्ये जास्त असतो. काही ठिकाणी स्ट्रिंजरकडून
त्याने पाकिटंही मागितली आहेत. याबाबतीत काही स्ट्रिंजर लोकांनी सोहन
लाळघोटेची तक्रारसुद्धा केली आहे.
आउटपुटमधल्या
टकलू हैवानने स्वतःची सवय इथेही सोडली नाही. आपण फार टॅलेंटेट आहोत असे तो
भासवतो. पण या माणसाकडे बेसीक नॉलेजपण नाही. गंभीर म्हणजे सहकारी
महिलांकडे तो कायम वाईट नजरेने पाहतो. आधी काम केलेल्या प्रत्येक
चॅनेलमध्ये त्याने हेच धंदे केले. त्यानेही बेदमला सतावून सोडले आहे.
लोकांना दाखवण्यापुरते बेदम आणि टकलू हैवान तुझ्या गळा माझ्या गळा गातात.
पण खाजगीत दोघेही एकमेकांची वाट कशी लावायची, याचे प्लान आखत असतात. बेदम
हा त्याचा खास विदेशपांडेला खाजगीत टकलू हैवानची वाट कशी लावायची, हे सांगत
असतो. तर टकलू हैवान हा नविन बॉस कर्मा यांच्या नजरेत बेदमच्या
चूुका त्याच्या नकळत आणून देतो. एका प्रतिस्पर्धी चॅनलच्या प्रोड्युसरशी
नाजूक संबंध असलेला टकलू हैवान
चांगल्या समाजासाठी
ची स्ट्रॅटेजी तिच्याशी शेयर करतो.
बाकीचे
म्हणजे बापू, टुमीत, चिल्लास विसरले, कमळाबाई बेरड वगैरे मंडळी असून
नसल्यासारखी आहेत. बापू स्टाफचं वेळापत्रक कसेही लावतो. सुट्ट्या देत नाही.
एकदा या बापूला रोहीत विश्वकर्मा यांनी नाइट शिफ्टमध्ये झोपलेले पकडले.
टुमीतकडे काही दिवसांसाठी इनपुटचे काम सोपवले. पण त्याने तिथे बावळटपणा
दाखवला.
सध्या
चांगल्या समाजासाठीचे मायबाप कर्मा आहेत.
त्यांनी अमराठी असून मराठी चॅनलची प्रतिष्ठा वाढवायचा प्रयत्न केला. पण
त्यांना स्टाफची साथ मिळेना झाली आहे. बेकामच्या बेदममुळे लोक
चांगल्या समाजासाठी
मध्ये यायला नकार देत आहेत. माणसं पाहिजे अशी जाहिरात देण्याची वेळ चॅनलवर
आली ती बेदममुळे हे विनोद यांनाही पटले आहे. उशीरापगार देणाऱ्या जय
महाराष्ट्रमध्ये जाऊ, पण
चांगल्या समाजासाठी
नको असं मीडियातले नवे आणि जुने लोक बोलत
असतात.
महत्त्वाचे म्हणजे चांगल्या
समाजासाठीच्या या चॅनलने बातम्या दाखवण्यात खूप घोळ घालूनसुद्धा चॅनेलचे
मालक रवी प्रकाश यांनी सर्वांना पगारवाढ दिली. पण पगारवाढ झाल्यानंतर लगेच
स्टाफने अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनाच्या महत्त्वाच्या बातमीत
घोळ घालून मालकाला तोंडात बोटे घालायला लावली.