नाशिक - झी २४ तासचा रिपोर्टर
किरण ताजणे यास परवा काही गुंडानी बेदम मारहाण केली. या प्रकरणी
किरण ताजणे हा पोलीस स्टेशनमध्ये जाण्याअगोदरच गुंड पोलीस स्टेशनमध्ये हजर होते. तेथील पोलीस निरीक्षक
किरण ताजणे याची फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल झाला पण मुख्य आरोपीस अदयाप अटक नाही.
राज्यात
पत्रकार / रिपोर्टर यांना काम करताना जीव मुठीत धरून काम करावं लागत आहे.
विरोधात बातमी आली की पत्रकारांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत.
कायद्याचा धाक राहिलेला नाही. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होवून दोन वर्ष
होत आली तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. श्रेय घेणारे मात्र आता तोंड
लपवून फिरत आहेत,
जबाब दो ?
> पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होवून दोन वर्ष झाली तरी अंमलबजावणी का नाही ?
> शिवशाही बसमधून पत्रकारांना मोफत प्रवास देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती म्हणे ? त्याचे काय झाले ?
> पत्रकारांना पेन्शन मिळणार होती ? घोडे कुठे पेंड खात आहे ?
# फक्त घोषणा आणि घोषणा ... अंमलबजावणीच्या नावाने शिमगा !
श्रेय लागणारे अधिस्वीकृती पत्रिका समितीचा राजीनामा देणार की पदाला चिटकून राहणार ?