सोलापुरी ओबामाची पुण्यातूनही हकालपट्टी

पुणे - बातमी जी व्यवस्था बदलेल चॅनलच्या संपादक पदावरून पायउतार झाल्यानंतर सोलापुरी ओबामाची पुण्यात उदय भविष्यपत्रामध्ये  आरएनडीमध्ये बदली करण्यात आली होती, पण एकही दिवस कामावर हजर न होता फुकट पगार लाटणाऱ्या या सोलापुरी ओबामाची अखेर तेथूनही हकालपट्टी करण्यात आली आहे.

विविध वृत्तपत्रांत विविध प्रताप  करून बातमी जी व्यवस्था बदलेल मध्ये संपादकपदावर आल्यानंतर चॅनल ऐवजी स्वतःची इमेज बिल्डिंग करणारा सोलापुरी ओबामाचे विविध प्रताप गाजू लागले, आवाजमध्ये जनतेचा आवाज दाखवण्याऐवजी स्वतःचा आवाज वाढवत गेल्याने चॅनलची माती झाली,  त्यामुळे मालकांनी त्याची 1 मार्च रोजी पुण्यात बदली केली आणि आरएनडी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग दिला, पण कामावर एकही दिवस  हजर न होता सोलापुरी ओबामा राज्याभर भाषणबाजी करत फिरत होता, तीन महिने फुकट पगार उचल्यानंतर सोलापुरी ओबामास एचआरकडून नोटीस देण्यात आली, त्यानंतर आज 1 सप्टेंबरपासून  कायमस्वरूपी उदय भविष्यपत्रातूनही नारळ देण्यात आला. चॅनलमधून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे चॅनल नंबर 1 वर आले तर पेपरमधून नारळ देण्यात आल्याने पेपचा दर्जा सुधारला.

सोलापूरच्या संचारमध्ये मुक्त संचार करून अकोल्यात मानबिंदूमध्ये बिंदू पटवून पुण्यात आलेल्या सोलापुरी ओबामाने नंतर अलिबागमध्ये विविध प्रताप करून, मुंबईमध्ये तेच गुण उधळले,त्यामुळे पुन्हा पुण्यात यावे लागले पण पंटरला सांगून  मालकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण आता तेल गेले, तूप गेले हाती धुपाटने आले, म्हणण्याची पाळी आली आहे. त्यामुळे  सोलापुरी ओबामास सर्व वृत्तपत्राची दारे बंद झाली आहेत.कोणताही पेपर आणि चॅनल सोलापुरी ओबामास घेण्यास तयार नाही. 

स्वतःमध्ये चेंज आवश्यक 

 सोलापुरी ओबामाने एक सुमार पुस्तक काढून एकाच आवृत्तीचे तीनदा प्रकाशन करून, तिसरी आवृत्ती असा बनाव केला. या भामट्याने लोकांना We The Change म्हणण्याऐवजी स्वतःमध्ये चेंज करण्याची गरज आहे. We The Change ऐवजी  Change in itself लिहावे...