एबीपी माझाच्या प्रतिनिधीवर खंडणी मागितल्याचा आरोप

बुलडाणा  - बुलडाना येथील एका खाजगी रुग्णालयात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी उघडकीस आली होती.  हे प्रकरण डॉक्टरांच्या अंगलट येणार असल्याने ते दाबण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या एबीपी माझाच्या चॅनलच्या प्रतिनिधीने तीन लाख रुपयांची खंडणी हस्तकामार्फत मागितल्याची माहिती पीडित डॉक्टरने पत्रकार परिषदेत घेऊन दिल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे ज्या प्रतिनिधीवर हे आरोप लावल्याचा गेले तो प्रतिनिधी या पत्रकार परिषदेमध्ये हजर होता. प्रकाराचा भांडाफोड होताच या पत्रकारांची शुगर 400 वर गेली होती अर्शी माहिती प्राप्त झाली आहे. 
       
  कर्जबाजारीला कंटाळून विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या शेतकऱ्याचा फक्त पैसे विना उपचार थांबवल्यामुळे उपचारा अभावी मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप बुलडाण्यातून समोर आला आहे. ही घटना बुलडाणा येथील एमडी मेडिसिन तज्ञ डॉक्टर मेहेत्रें खाजगी रुग्णालयात घडली आहे. दुसरीकडे हे आरोप रुग्णालयाकडून फेटाळण्यात आले आहे मात्र सदर प्रकरण दाबण्यासाठी बुलढाणा येथील एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी हस्तकामार्फत आपल्याला तीन लाख रुपयांची खंडणी मागितली आहे व खंडणी दिल्यानंतर त्याला कुणालाही पैसे द्यावे लागणार नाही मी सर्व मॅनेज करून घेईल" असे सांगितल्या केल्याचा खळबळजनक खुलासा डॉक्टर मेहेत्रे यांनी काल बुलढाणा येथे आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे पुरावे डॉक्टर मेहेत्रे यांनी एबीपी माझाचे संपादक श्री खांडेकर यांच्यापर्यंत पोहोचविल्याचे ही समजते मात्र दोन दिवस उलटले तरी चॅनल कडून कुठलाही प्रतिसाद दिल्या जात नसल्याने अशा प्रवृत्तींना या चॅनल मध्येही थारा दिला जात असल्याचे आरोप होत आहे.
उल्लेखनीय म्हणजे एबीपी माझाचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी संदीप शुक्ला यांच्याविरुद्ध खंडणीच्या अनेक तक्रारी आणि आरोप चॅनल पर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये काही काळासाठी शुक्ला यांचे कामही थांबविण्यात आले होते मात्र चॅनल मधील विशिष्ट लॉ बी खंडणीखोरां च्या पाठीशी उभे राहत असल्याने शुक्ला सारखे मंडळी आजही समाजात ताठ मानेने उभी आहे. या प्रतिनिधींच्या विरोधात काही महिन्यापूर्वी शेगाव येथील एका सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एका वक्त्याने चॅनल आणि प्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख करून भर सभेत खंडणीचा आरोप केला होता हि क्लिप हि सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती.  याशिवाय एका बातमीसाठी पैसे मागितले ची क्लिपही एका वर्षापूर्वी व्हायरल झाली होती. त्यानंतर आता तर पत्रकार परिषद घेऊन खंडणीचा खुलासा झाल्याने आता संबंधित चॅनल काय करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.