संदीप शुक्ला यांचा आरोपांबाबत खुलासा

 
मागील महिन्यात   बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्याच्या मूर्ती गाव मध्ये येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष खराटे याने त्याच्यावरील दोन लाखाच्या वर कर्ज असल्याने त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गावकरी नी त्याला बुलढाणा च्या डा राहुल म्हेत्रे यांच्या रुग्णालयात दाखल केले नन्तर जेव्हा रुगणाची पत्नी आणि मुलगा रुग्णालयात आले त्यांनी डा राहुल मेहत्रे यांना  किती खर्च येईल आणि पेशनट ची स्थिती बाबत विचारले असता 48 तासात सांगतो व नन्तर दोन दिवसात सांगतो असे म्हणत त्याला 14 दिवस रुग्णाला  व्हेंटिलेटरवर ठेवले दरम्यान आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या नातेवाईकांनी इकडून तिकडून जमवून 38 हजार रुग्णालयात भरले त्यांच्या कडे काहीच पैसे उरले नव्हते आणि डाकतर पैसे भरा मेडिसिन आणा असा तकादा लावत होते शेवटी या नातेवाईकांनी आम्हाला खर्च परवडत नाही आमच्या कडे आता पैसेही नाही आम्ही आमचा रुग्ण सरकारी रुग्णालयात नेतो असे डॉ राहुल म्हेत्रे ना सांगितले त्यावेळी डा राहुल मेहेत्रे यांनी हास्पिटल चे एक लाख दहा हजार आणि औषध जे त्याच्याच दुकानातून घ्यावे लागते त्याचे 45हजार असे दीड लाख बिल काढले आणि हे पैसे भरा आणि तुमचा रुग्ण हलवा असा दम नातेवाईकांना भरला आम्ही गरीब आहोत गरिबीतून कर्जबाजारी झालो म्हणून पतीने विष पिले असे गयावया शेतकरी रुग्णाच्या पत्नीने वारंवार केली तुमचे बिल देण्यासाठी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागेल आता आम्हाला कोणी कर्ज ही देईनात म्हणून डा म्हेत्रे चे पाय धरले पण डा म्हेत्रे यांना त्यांची दया आली नाही तुम्हाला बिल भरावेच लागेल पैसे आणा नन्तरच पुढचा उपचार होईल  असा पवित्रा त्यांचा होता शेवटी रुग्णाच्या मुलाने आणि नातेवाईकांनी डा राहुल म्हेत्रे यांचे स्ट्रिंग केले ज्यात सर्व वास्तविकता ढळढळीत दिसते आहे आणि ते स्ट्रिंग घेऊन ते मीडिया कडे आले दरम्यान सतत चा तकादा लावून पैसे न भरत असल्याने डा राहुल मेहत्रे नी रुगणाचा उपचार देखील बंद केला होता असे नातेवाईक रडून रडून सांगत होते.

टीव्ही मीडिया चे आम्ही पाच सहा रिपोर्टर सर्व प्रथम यांना घेऊन गेलो ते बुलढाणा चे ठाणेदार कडे त्यांना हकीगत सांगितली तुम्ही काय मदत करू शकता विचारले ते म्हणाले की तुम्ही रिपोर्ट देऊ शकता पण मी ही केस सिव्हिल सर्जन ला ओपिनियन साठी रेफर करेल कारण आम्ही टेक्निकल हॅन्ड नाही म्हणून आम्ही यांना सिव्हिल सर्जन डा पंडित यांच्या कडे घेऊन गेलो पण ते सुटी वर होते आर एम ओ भेटले पण अश्या केस मध्ये आम्हाला अधिकार नाही तुम्ही जिल्हाधिकारी यांना भेटा त्यांना पूर्ण अधिकार आहेत असे सांगत कानावर हात ठेवले शेवटी आम्ही या नातेवाईकांना जिल्हाधिकारी डा निरुपमा डांगे यांच्या कडे घेऊन गेलो त्यांना नातेवाईकांनी सांगितले की आमच्या कडे पैसे नाहीत आम्ही आता पर्यंत 38 हजार भरले आहेत आणि पैसे नसल्याने डा राहुल मेहत्रे नी आमच्या रुगणाचा उपचार बंद केला आहे ही सर्व स्थिती सांगितली स्ट्रिंग विषयी सांगितले जिल्हाधिकारी नी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आणि लगेच डा राहुल म्हेत्रे यांना फोन वरून त्या पेशनट ला सरकारी मध्ये रेफर करा अन्यथा तुमच्या वर गुन्हे दाखल करेन असा आदेश दिला आणि सिव्हिल सर्जन ना रुग्णाला सरकारी मध्ये हलवा असा आदेश दिला सायंकाळी जेव्हा सिव्हिल सर्जन ची टीम डा राहुल म्हेत्रे यांच्या रुग्णालयात गेली तेव्हा त्यांनी त्याला रेफर केले नाही मात्र नातेवाईकांना पैश्या साठी डा मेहत्रे चा तकादा सुरूच होता तुम्हाला बिल भराचेच लागेल असा दम ते देतच होते  दुसरे दिवशी रुग्णाचे नातेवाईक आम्हा रिपोर्टर ना भेटले बाबा ही स्थिती खराब होत आहे डा म्हेत्रे त्यांना सुटी देतच नाही असे रुग्ण च्या मुलाने सांगितले आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या कडे गेलो मॅडम खामगाव ला मीटिंग ला निघून गेल्या होत्या आम्ही एडिशनल क्लेकटर प्रमोदसिह दुबे यांना फोन केला ते ही हजर नव्हते म्हणून आम्ही आरडीसी ललीतकुमार वर्हाडे यांच्या कडे नातेवाईकांना घेऊन गेलो त्यांना सर्व घटनेची इतयंभूत कल्पना होती त्यांनी लगेच सिव्हिल सर्जन डा पंडित यांना फोन केला आणि या प्रकरणात जिल्हाधिकारी मॅडम ने कालच आदेश दिले आहेत तुम्ही मेहत्रे हास्पिटल ला स्वतः जा आणि रुग्ण हलवा असे सांगितले वरून डा पंडित त्या रुग्णालयात गेले थोड्या वेळात डा मेहत्रे शी बोलून बाहेर मीडिया ला सांगितले की रुग्ण रेफर होत आहे आणि नातेवाईक ना डा मेहत्रे ना भेटून कागज पत्रिय प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितले जेव्हा रुग्ण डा मेहत्रे च्या केबिन मध्ये गेले त्यांनी तुम्ही काही तरी पैसे भरा असा दम भरला दरम्यान आम्हाला माहीत पडले की रुग्ण दगावला आहे आम्ही नातेवाईकांना जे डा च्या केबिन मध्ये कागद पत्रिय पूर्तता करण्यास सिव्हिल सर्जन च्या सांगण्यावरून गेले होते त्यांना रुग्णाविषयी विचारायला सांगितले नातेवाईकांनी  रुग्ण विषयी विचारले तेव्हा डा राहुल म्हेत्रे म्हणाले की तुमचा पेशनट मेला आहे एखाद्या थरारक चित्रपट ला लाजवेल अशी ही भय कथा आहे पैश्या अभावी उपचार विना एक गरीब शेतकऱ्याने जीव गमावला होता सगळी शासकीय यंत्रणा आणि मीडिया च्या तीन दिवसांच्या संघर्षाची ही परिणीती होती या सर्वांवर डा मेहत्रे सारखी प्रवुत्ती विजयी ठरली होती आम्ही स्पेशल हरलो होतो.  त्या दिवशी संध्याकाळी मी एकटा खूप रडलो आणि स्वतः काहीच करू शकलो नाही एक जीव वाचवू शकलो नाही याची लाज वाटली.

हे इथेच संपले नाही नन्तर पोलीस आले पंचनामा सुरू झाला आम्ही पण तिथेच ठाण मांडून बसलो मृत शेतकऱ्याच्या मुलाने पोलीस ठाण्यात रिपोर्ट देणार असा पवित्रा घेतला त्याला पोलीस ठाण्यात पाठवले तर तिथून निरोप आला की काही गाव पुढारी त्याला रिपोर्ट देऊ नको असा दम देत आहेत आम्ही लगेच पोलीस ठाणे गाठले आणि तिथे जाऊन बसलो रात्री नऊ वाजता रीतसर रिपोर्ट झाला दुसर्या दिवशी पोलिसांनी ऑन केमेरा पोस्ट मार्टम केले आणि मग सगळीकडे बातम्या सुरू झाल्यात ही झाली इतयंभूत वस्तुस्थिती आता राहिला डाकतरच्या आरोपाचा विषय.

 जो व्हिडीओ दाखवला त्यात डा मेहत्रे म्हणत आहेत की एबीपी माझा चे संदीप शुक्ला यांनी रुग्ण च्या नातेवाईकांना सांगितले की तुम्ही पैसे भरू नका पैश्याचे पाहून घेऊ आणि नन्तर एका अज्ञात व्यक्ती ने मला रुग्णालयाचया बाहेर तीन लाख मागितले तो व्हिडीओ आम्ही जेव्हा रुग्ण मरण पावला त्या बातमी साठी डा ची प्रतिक्रिया घेण्यास गेलो त्या दिवशी चा आहे कुणी पैसे मागितले यावर डा मेहत्ते म्हणतात की मी त्याला ओळखत नाही त्याला कधीच पाहिले नाही तो कधीच भेटला नाही आम्ही त्याचा स्केच द्या आपण त्याला शोधू आणि तुमच्या पहिले आम्ही त्याचा रिपोर्ट देऊ असे म्हणूनही डा मेहत्रे काहीच सांगू शकले नाही या दरम्यान माझ्या विरोधातील पत्रकार कंपू ने दैनिक विशवं विजेता मध्ये अग्रलेखात मी खंडणी मागितली असे छापून ती पोस्ट सोशल मीडिया वर भरपूर व्हायरल केली. आता दुसरी बाजू पहा तीन दिवसा पूर्वी आय एम ए ने पत्रकार परिषद घेतली होती त्यात डा राहुल म्हेत्रे यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा ते या व्हिडीओ मध्ये म्हणतात जी एक दोन पत्रकारांनी रुग्ण च्या नातेवाईकांना बिलाचे  पैसे देऊ 
नका आम्ही पाहून घेऊ असे सांगितले पत्रकारांनी पैसे मागणाऱ्या विषयी विचारले तेव्हा माझ्या जवळ पुरावा आल्यावर मी बोलेन असे ते म्हणतात तुम्हाला कुणी पत्रकार च्या नावावर पैसे मागितले का असे विचारल्यावर पुरावा आल्यावर बोलेन असे म्हणतात तर दवाखान्याची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे त्यातून तपासून त्या पैसे मागणाऱ्या  व्यक्तीचा शोध घेणार असे डॉ मेहत्रे या व्हिडिओत  म्हणतात आणि तू जो व्हिडीओ दाखवला त्यात तो पैसे मागणारा  व्यक्ती दवाखान्या बाहेर भेटला असे म्हणतात मग तो व्यक्ती दवाखान्या बाहेर भेटला असे आहे तर तो हास्पिटल च्या सीसीटीव्ही मध्ये कसा येणार

एक कर्जबाजारी शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि पैश्या अभावी डा मेहत्रे ने उपचार बंद केल्याने सुभाष खराटे दगावला हा विषय अंगावर येत असल्याने मीडियाला घाबरवण्या साठी डा म्हेत्रे ने हा प्रयोग केला आणि त्याचे भांडवल केले आमच्या हित शत्रू नी इथे मला आरोपी च्या पिंजऱ्यात उभे केले गेले आता खरे आरोपी कोण आहेत हे तूच तपास बेरक्या डाकतर सारखी समाजात फोफावणारी शोषण व्यवस्था की ज्यांच्याशी आपले पटत नाही त्यांना कसेही करून उध्वस्त करण्याची पत्रकारितेत फोफावत असलेली ही व्यवस्था की मी कोण दोषी हे तूच ठरव आणि न्याय कर  आणि पत्रकार आणि पत्रकारिता टिकवून ठेव नाहीतर या पुढे गरिबांना शेतकऱयांना पूर्ण ताकतीने मदत करण्यासाठी माझ्या सारख्या कुणी कधीच पुढे धजावणार नाही


संदीप शुक्ला
बुलढाणा