जामखेड
- जालना
जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथील दोन पत्रकारांनी सुरु केलेल्या
पत्त्याच्या क्लबवर आज गुरुवारी भल्या पहाटे अप्पर पोलीस अधीक्षक समाधान
पवार यांनी धाड टाकून दोन पत्रकार, एक सेवानिवृत्त सहायक फौजदार, अशा एकूण ९
जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अंबड
तालुक्यातील जामखेड येथे दिव्य मराठीचा पत्रकार पंकज मंडलिक याचे गायत्री
बियर शॉपी नावाचे दारूचे दुकान आहे. या दुकानाच्या पाठीमागील एका खोलीत
पंकज मंडलिक आणि तेथील दैनिक पुढारीचा पत्रकार आबासाहेब भोजने याने गेल्या
काहीं दिवसापासून पत्त्याचा क्लब सुरु केला होता. या क्लबवर आज भल्या पहाटे
२ वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी धाड टाकली.
यावेळी पोलिसांनी पत्रकार पंकज मंडलिक, आबासाहेब भोजने, सहायक फौजदार
किसनराव तारडे यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी रोख ६८
हजार रुपये, ११ मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता पत्रकारावर संबंधित वृत्तपत्राचे प्रशासन काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.