मुंबई - ज्या चॅनलचा टीआरपी चार ते सहामध्ये असतो त्या जय महाराष्ट्र्र चॅनलवर परवा झालेल्या एका डिबेट शो मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एका माजी न्यायमूर्तीनी एका समाजालाबद्दल अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याने या चॅनलला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
जय महाराष्ट्र चॅनलवर रात्री साडेआठ वाजता लक्षवेधी नावाचा डिबेट शो असतो.परवा नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी सनातनचे काही साधकाना अटक झाल्याने त्यावर डिबेट शो सुरु होता. त्यात एका माजी न्यायमूर्तीनी एका समाजाबद्दल ऑन एअर अपशब्द वापरून हिंदू जनजागृतीच्या प्रवक्त्यास शिव्या घातल्या.
त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले असून, त्या समाजाच्या लोकांनी सोशल मीडियावर ती क्लिप व्हायरल करून चॅनलचा नंबर दिला आहे. त्यावरून चॅनलला असंख्य फोन केले जात असून जाब विचारला जात आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी त्रस्त झाले आहेत.